आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CCI Diagnosis Of Defeat: Restrict Company Of Wives And Girlfriends

कोहलीच्या कर्माने... आता प्रेयसीच काय, पत्नीलाही नेता येणार नाही दौर्‍यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - विराट कोहली महिलेसोबत फिरताना. अद्याप त्‍या महिलेची ओळख पटली नाही.)
नवी दिल्‍ली - कसोटीमध्‍ये इंग्‍लंडबेराबर 3-1 असा मानहाणीकारक पराभ्‍ाव स्विकारल्‍यानंतर बीसीसीआयने भारतीय संघ व्‍यवस्‍थापनात बदल केले आहेत. तसेच काही कठोर निर्णय घेण्‍यात आले आहेत. त्‍यापैकीच एक निर्णय म्हणजे, 'खेळाडूंना विदेशी दौ-यावर प्रेयसी किंवा पत्‍नींना सोबत नेता येणार नाही.
बीसीसीआयच्‍या एका अधिका-याने सांगितले की, ''इंग्‍लंड दौरा आमच्‍यासाठी डोळ्यात अंजन घालणारा होता. आम्‍हाला असे कळले की, जेव्‍हा खेळाडूंची व्‍यायामाची किंवा सरावाची वेळ असते तेव्‍हा त्‍यांच्‍या पत्‍नी त्‍यांना बाहेर फिरायला नेतात. त्‍यामुळे त्‍याचा खेळावर विपरीत परिणाम होतो.''
अनुष्‍काला सोबत घेऊन गेला होता विराट
इंग्‍लंड दौ-यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडूंच्‍या पत्‍नींना सोबत घेऊन जायला परवानगी दिली होती. परंतु विराट कोहली तर प्रेयसीलाच घेऊन गेला होता. इंग्‍लंडमध्‍ये चेतेश्‍वर पुजारा, मुरली विजय, आर.अश्विन, स्‍टुअर्ट बिन्‍नी, धोनी आणि गंभीर यांच्‍या पत्‍नींना सोबत जाण्‍याची परवानगी दिली होती.
पत्‍नी किंवा गर्लफ्रेंड सोबत घेवून जाणा-या खेळाडूंची कामगिरी
विराट कोहली

विराट कोहलीने इंग्लंडमध्‍ये 5 कसोटी सामन्‍यांतील 10 पारींमध्‍ये 13.4च्‍या सरासरीने 134 धावा केल्‍या.

चेतेश्वर पुजारा
पुजारा ने इंग्लंडमध्‍ये 5 कसोटी सामन्‍यांतील 10 पारींमध्‍ये 22.20 च्‍या सरासरीने 222 धावा केल्‍या.

गौतम गंभीर
गंभीरने इंग्लंडमध्‍ये 2 कसोटी सामन्‍यांतील 4 पारींमध्‍ये 25 धावा केल्‍या. चार पारींमध्‍ये त्‍याचा स्‍कोर 18, 4, 0 आणि 3 होता.

मुरली विजय
सलामीवीर मुरली विजयने 10 पारींमध्‍ये 452 धावा केल्‍या. त्‍याने 18, 2, 0, 18, 35, 12, 24, 95, 146 आणि 52 धावा केल्‍या.
पुढील स्‍लाइडवर पाहा, भारतीय क्रिकेटपटूंची पत्‍नी आणि मुलांसोबतचे छायाचित्रे...