आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला 52.24 कोटींचा दंड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) शुक्रवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला 52.24 कोटींचा दंड ठोकला. शुक्रवारी सीसीआयने ही कारवाई केली. येत्या 90 दिवसांमध्ये क्रिकेट मंडळाला हा दंड भरावा लागणार आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकाराचा गैरफायदा घेतला आणि स्पर्धा कायद्यानुसार काम केले नाही. दिल्लीचे सुरिंदर सिंग बर्मीने नोव्हेंबर 2010 मध्ये बीसीसीआयविरुद्ध याचिका दाखल केली होती. बीसीसीआयने अनधिकृत संपत्ती जमा करून इंडियन प्रीमियर लीगमध्ये अनेक प्रकारचे आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला होता. बीसीसीआयकडे मोठे आर्थिक पाठबळ आहे आणि या क्रिकेट मंडळाने आयपीएलमध्ये मोठय़ा प्रमाणात पैसा कमावला आहे, असे सीसीआयने आदेशात म्हटले आहे.

बाजार व्यवस्थेत बीसीसीआयचा एकाधिकार आहे. या क्रिकेट मंडळाला कोणताही प्रतिस्पर्धी नाही. या मंडळाच्या नीतीमुळे इतर संस्थांना स्पर्धेत येण्याची संधी मिळत नाही. याचे कारण बीसीसीआयचीच मक्तेदारी आहे, असेही सीसीआयने आदेश पत्रात म्हटले.