आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebration After Team India\'s Win Over Pakistan

क्रीझ-फायर : \'आपला वर्ल्डकप तर आला\', गल्लीपासून सीमेपर्यंत विजयोत्सव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिलेड - वर्ल्डकपचीयापेक्षा झक्कास सुुरुवात अाणखी ती काय... पाकिस्तान चारीमुंड्या चीत झाला. भारताने 76 धावांनी विजय मिळवत पाककडून हरण्याचा विक्रम अबाधित ठेवला. विराट असो वा धवन, किंवा रैना.. क्रीझमध्ये त्यांच्या तुफान फायरिंगमुळे स्कोअर 300 पर्यंत पोहोचला.
फोटो - पाकविरोधात विजयानंतर देशभरात जल्लोष करण्यात आला.
वर्ल्डकपमध्ये पाकविरुद्ध सर्वाेच्च. उरलीसुरली कसर शमी, मोहित उमेशने भरून काढली. त्यांच्या वेगवान माऱ्यापुढे पाकची भंबेरी उडाली. काट्याची लढत बघता बघता एकतर्फीच ठरली. 224 च्या स्कोअरवर पाकच्या शेवटच्या फलंदाजाचा झेल उमेशच्या हाती विसावताच देशातील अाबालवृद्धांच्या तोंडी एकच जयघोष होता - बाकी जाऊ द्या, आपला वर्ल्डकप तर आला!
23 वर्षांनंतरही 6-0
1992 :43धावा
1996: 39धावा
1999: 47धावा
2003: 4विकेट
2011: 29धावा
2015: 76धावा

विराट योगायोग, भारत पुन्हा वर्ल्डकप जिंकणार?
> भारताने वर्ल्डकपमध्ये 4 वेळा पहिल्याच सामन्यात विजय मिळवला. त्यापैकी 3 वेळा फायनल गाठून दोन वेळा जगज्जेता झाला. एक वेळा 1996 मध्ये सेमीत पोहोचला.
> 2011 मध्ये विराटने पहिल्याच सामन्यात शतक केले होते. तेही भारतीय उपखंडातील संघ बांगलालादेशविरुद्ध. आता पाकिस्तानविरुद्धही त्याने दमदार शतक ठोकले आहे.

वर्ल्ड कपमधील 5 विक्रम
> 129 धावांची भागीदारी विराट कोहली-धवनची.
> वर्ल्डकपमध्ये पाकविरुद्ध आजवरची सर्वात मोठी.
> अश्विनची 3 निर्धाव षटके. वेंकटराघवन यांनी 1979 मध्ये 3 मेडन टाकल्या.
> भारताची 6 पैकी 5 वेळा टॉस जिंकून फलंदाजी. 2003 मध्ये पाकनेही आधी फलंदाजीच केली.
> विराटच्या 107 धावा. सचिनचा 12 वर्षांपूर्वीचा 98 धावांचा विक्रम मोडीत काढला.
स्कोअर
> भारत : 300धावा, 7 विकेट
> पाक : 224धावा, 10 विकेट
पुढील स्लाइड्सवर पाहा, चाहत्यांच्या सेलिब्रेशनचे PHOTOS