आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebration Party Of Indian Cricket Team Players In Rajkot

PHOTOS: राजकोटमध्‍ये टीम इंडियाने अशापद्धतीने साजरा केला विजयाचा जल्‍लोष...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट- सचिन तेंडुलकरच्‍या निवृत्तीच्‍या घोषणेमुळे निराश झालेल्‍या क्रिकेट चाहत्‍यांना टीम इंडियाचा सिक्‍सर किंग युवराज सिंगच्‍या धमाकेदार पुनरागमनाने खूशखबर दिली. युवीच्‍या वादळी पुनरागमनाच्‍या (35 चेंडूत 77 धावा) जोरावर टीम इंडियाने धावांचा डोंगरही सहा विकेट राखून सहज पार केला. युवी आणि कर्णधार एमएस धोनीने केवळ 51 चेंडूत शतकी भागीदारी करीत 202 धावांचे लक्ष्‍य दोन चेंडू राखत पार केले.

सामनावीर ठरलेल्‍या युवीने आपल्‍या 77 धावांच्‍या खेळीत 8 चौकार आणि 5 षटकार ठोकले. धोनीनेही नाबाद 24 धावा केल्‍या. टीम इंडियाकडून शिखर धवनने 32 आणि सुरेश रैनाने 29 धावांचे योगदान दिले.

टीम इंडियाच्‍या या जबरदस्‍त कामगिरीमुळे राजकोटवासीयांना दिवाळी साजरा करण्‍याची संधी मिळाली. स्‍टेडिअमच्‍या चारी बाजूंनी आतषबाजीचा नजारा पाहायला मिळाला. त्‍याचबरोबर टीम इंडियाच्‍या खेळाडूंनी इंपिरिअल पॅलेस हॉटेलमध्‍ये आयोजित पार्टीत एकच जल्‍लोष केला. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा विजयाचा जल्‍लोष साजरा करण्‍यात मग्‍न असलेले टीम इंडियाचे धुरंधर...