आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सबिनाच्या सौंदर्यामुळे खेळाचा विचका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कझाकिस्तानमध्ये जन्मलेल्या सबिना अल्तिनबेकोवाने लहान वयातच खेळाडू होण्याचे स्वप्न बाळगले होते. तिचे वडील स्कीइंग खेळाडू आणि आई ट्रॅक व फिल्ड अ‍ॅथलिट आहे. सबिनाने मात्र, व्हॉलीबॉलचे मैदान निवडले आणि त्यात ती राष्ट्रीय खेळाडू झाली. काही दिवसांपूर्वी तैपईमधील आशियाई अंडर 19 व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी आलेली 17 वर्षीय सबिना आपल्या सौंदर्यामुळे सोशल मीडियात चर्चेत राहिली. स्पर्धा संपेपर्यंत चाहत्यांनी चार फेसबुक पेज तयार केले. त्यास दोन लाख तरुणांनी लाइक केले आहे. हजारो चाहत्यांनी ट्विट केले. एका स्थानिक वृत्तपत्राने तिच्या सौंदर्यावर मोहित होऊन 10 पानी विशेष आवृत्ती प्रकाशित केली. चाहत्यांच्या गोंगाटामुळे खेळाडू खेळावर लक्ष केंद्रित करू शकत नव्हते, असे सबिनाच्या प्रशिक्षकाचे म्हणणे आहे.

पुढील स्लाइडमध्ये, बेव्हर्लीची जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक कार 2015 पर्यंत बाजारात