आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य विभाग सहाव्यांदा दुलीप ट्रॉफीचा विजेता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या पीयूष चावलाच्या नेतृत्वाखाली मध्य विभागाने गतविजेत्या दक्षिण विभागाला ९ धावांनी धुळ चारून सहाव्यांदा दुलीप चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
मध्यने दक्षिण विभागाला विजयासाठी दिलेल्या ३०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याचा डाव २९१ धावांवर आटोपला. सामनावीर ठरलेला दक्षिणचा लोकेश राहुल दुस-या डावात १३० धावांची खेळी करूनदेखील संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

दक्षिण विभाग कालच्या एक बाद १८४ धावांच्या पुढे खेळताना रविवारी २९१ धावा करू शकला. कालचा नाबाद लोकेश राहुल केवळ ९ धावांची भर घालू शकला. लोकेशला १३० धावांवर पंकजसिंगने पायचीत करून मोठा अडथळा दूर केला. त्याने १५२ चेंडूंत १४ चौकार आणि ५ षटकार खेचले. लोकेशने दुस-या विकेटसाठी बाबा अपराजितच्या साथीने १०७ धावांची भागीदारी रचली.

मध्य विभागाचे विजेतेपद
१९७१-७२, १९९६-९७, १९९७-९८ संयुक्त, १९९८-९९, २००४-०५, २०१४-१५.

रॉबिन बिष्ट चमकला
मध्य विभागाकडून डावखुरा फलंदाज रॉबिन बिष्टने लढतीत शानदार प्रदर्शन केले. त्याने १७४ चेंडूंत ८ चौकार आणि ४ षटकार खेचत नाबाद १२१ धावा करत आपल्या संघाकडून एकमेव शतक झळकावले.

संक्षिप्त धावफलक
मध्य विभाग : पहिला डाव २७६, दुसरा डाव ४०३. दक्षिण विभाग : पहिला डाव ३७९, दुसरा डाव २९१. लोकेश राहुल १३०, बाबा अपराजित ५६, आर. प्रसन्ना २९ धावा. अली मुर्तझा ३/५९, पीयूष चावला ३/८३.