आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Central Government And Other Entities Give Help To Makhan Singh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मक्खनच्या कुटुंबावर आता धनवर्षाव !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आशियाई सुवर्णपदक विजेता धावपटू मक्खनसिंगच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसाठी शनिवारी दोन घोषणा करण्यात आल्या. क्रीडा मंत्रालयाने दोन लाख रुपये, तर पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डने पाच लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे.

केंद्रीय पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी 5 लाख रुपये देण्याची घोषण केली. आम्हाला मक्खनच्या कुटुंबीयांबद्दल माहिती झाली तेव्हा लगेचच पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डच्या (पीएसपीबी) अध्यक्षांना तत्काळ मक्खनच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आदेश देण्यात आले, असे मोईली यांनी म्हटले.


मक्खनने 1962 मध्ये कोलकात्याच्या राष्‍ट्रीय क्रीडा स्पर्धेत मिल्खासिंगला हरवले होते. त्याने 1962 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन पदके जिंकली होती. मक्खनसिंगच्या कुटुंबीयांना रोख दोन लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली, अशी माहिती केंद्रीय क्रीडामंत्री जितेंद्रसिंग यांनी शनिवारी दिली.

मिल्खाने केली आर्थिक मदत
मिल्खासिंगने मक्खनच्या मृत्यूनंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबीयांना अनेक वेळा आर्थिक मदत केली. हे दोघेही सोबत सराव करत होते.