आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Century Salute By Cheteshwar Pujara Rohit Sharma To Sachin

चेतेश्वर पुजारा-रोहित शर्माची सचिनला शतकी सलामी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन तेंडुलकरच्या 74 धावांच्या कसोटी कारकीर्दीतील समारोपाच्या खेळीने आज भारताच्या पुजारा आणि रोहित शर्मा या दोन शतकवीरांच्या पराक्रमालाही झाकोळून टाकले. मात्र, पुजारा आणि शर्मा यांच्या शतकांनीच भारताला विंडीजविरुद्ध दुस-या क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात 313 धावांची आघाडी मिळवून दिली. दिवसअखेरच्या 13 षटकांच्या खेळात विंडीजचे 3 फलंदाज 43 धावांत तंबूत पाठवून भारताने आणखी एका डावाच्या विजयाकडे आगेकूच केली आहे. भारतीय संघाच्या अश्विन (2/12) आणि ओझाने (1/12) दुस-या दिवशी आपल्या गोलंदाजीचा कहर केला.
भारताच्या डावात प्रेक्षकांनी क्रिकेटच्या तीन वेगवेगळ्या त-हा पाहिल्या. सचिनची खेळी पाहण्यासाठी पहिल्या चेंडूपासून प्रेक्षक उपस्थित होते. त्याने कालच्या नाबाद खेळीत आणखी 36 धावांची भर घालताना फलंदाजीच्या कौशल्याचे अनेक नमुने पेश केले. शिलिंगफोर्डला स्क्वेअरकट मारून ‘गुड मॉर्निंग’ करणा-या सचिनने स्वीप, स्क्वेअर ड्राइव्हचे दोन फटके मारले. बेस्टच्या गोलंदाजीवर अप्परकटचे दोन प्रयत्न फसल्यानंतर सचिनने हाराकिरी केली नाही. सचिनने शुक्रवारीही या फटक्यांवरील आपली हुकुमत सिद्ध केली. देवनारायणच्या चेंडूला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात त्याने सॅमीकडे झेल दिला व याच मैदानावर शंभराव्या हुकलेल्या शतकाच्या स्मृती चाळवल्या गेल्या.
सचिनने शिलिंगफोर्डच्या 35 व्या षटकात तिस-या व चौथ्या चेंडूला दोन चौकार ठोकून दिवसाची दमदार सुरुवात केली. त्याने पुजारासोबत तिस-या विकेटसाठी 144 धावांची भागीदारी केली. सचिनने 68 वे कसोटी अर्धशतक झळकावले. त्याने 118 चेंडूंत 12 चौकार ठोकून 74 धावांची खेळी केली.
270 धावांची भारताकडे आघाडी
495 धावा भारताच्या पहिल्या डावात
113 धावांची चेतेश्वर पुजाराची खेळी
86 वेळा सचिनची शतकी भागीदारी
पुजारा चमकला
चेतेश्वर पुजाराने विंडीजविरुद्ध कसोटीत करिअरमधील पाचवे शतक झळकावले. याशिवाय यंदा कसोटीत 500 धावा पूर्ण करणार चेतेश्वर पुजारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्याने 78.42 च्या सरासरीने सहा कसोटीत ही कामगिरी केली. यात प्रत्येकी दोन शतक व अर्धशतकांचा समावेश आहे.
रोहित शर्माचे सलग दुसरे कसोटी शतक
टीम इंडियाच्या रोहित शर्माने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरून आपले सलग दुसरे कसोटी शतक पूर्ण केले. ओझा धावचीत झाला तेव्हा भारताच्या धावफलकावर 9 बाद 415 धावसंख्या होती. भारताच्या डावाचा शेवट स्पष्ट दिसत होता. रोहित 45 धावांवर खेळत होता. त्याने पुन्हा एकदा मुंबईची खडूस वृत्ती मैदानावर दाखवून दिली. त्याने महंमद शमी याला विंडीज गोलंदाजीपासून सतत दूर ठेवून आपले सलग दुस-या कसोटीतील दुसरे शतक पूर्ण केले. त्याने 127 चेंडंूत नाबाद 111 धावांत 11 चौकार व 3 षटकार मारले.
भारतीय क्रिकेटमध्ये नव्या युगाच्या उदय ?
चौकार, षटकारांची चौफेर फटकेबाजी करून रोहितने एक मास्टर ब्लास्टर निवृत्त होत असताना दुसरा नवा उदयाला येत असल्याचे संकेत दिले. त्याने विंडीजच्या वेगवान गोलंदाजांनी आपटलेले चेंडू सीमापार पाठविले. फिरकी गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने खेळपट्टीच्या समोर ड्राइव्हज मारले.
अन्.... ठोका चुकला!
दोन दिवसांपासून सचिन....सचिन...सचिन नावांच्या गजरात चाहत्यांच्या उपस्थितीने क्रिकेटची पंढरी (वानखेडे स्टेडियम) दुमदुमली. मात्र, सामन्याच्या 47.5 षटकांत कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. क्रिकेटचा देव सचिन देवनारायणकडून बाद झाला अन् मैदानावर सन्नाटा पसरला.
धावफलक
वेस्ट इंडीज पहिला डाव सर्वबाद 182 धावा
भारत पहिला डाव सर्वबाद 495 धावा
भारत पहिला डाव धावा चेंडू 4 6
विजय झे.सॅमी गो.शिलिंगफोर्ड 43 55 8 0
धवन झे.चंद्रपॉल गो.शिलिंगफोर्ड 33 28 7 0
चेतेश्वर पुजारा झे व गो.शिलिंगफोर्ड 113 167 12 0
तेंडुलकर झे. सॅमी गो.देवनारायण 74 118 12 0
कोहली झे.सॅमी गो.शिलिंगफोर्ड 57 78 5 0
रोहित शर्मा नाबाद 111 127 11 3
धोनी झे.सॅमी गो.बेस्ट 4 10 0 0
अश्विन झे आणि गो.गॅब्रिएल 30 32 4 1
भुवनेश्वर झे.सॅमी गो.शिलिंगफोर्ड 4 6 1 0
ओझा धावबाद (पॉवेल) 0 1 0 0
मो.शमी झे.बेस्ट गो. देवनारायण 11 29 2 0
अवांतर : 15. एकूण : 108 षटकांत सर्वबाद 495 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1-77, 2-77, 3-221, 4-315, 5-354, 6-365, 7-409, 8-414, 9-415, 10-495 गोलंदाजी : सॅमी 9-1-41-0, गॅब्रिएल 16-0-85-1, शिलिंगफोर्ड 43-6-179-5, बेस्ट 18-0-93-1, सॅम्युअल्स 11-0-42-0, देवनारायण 11-0-45-2
वेस्ट इंडीज दुसरा डाव 3 बाद 43 धावा
वेस्ट इंडीज धावा चेंडू 4 6
क्रिस गेल नाबाद 6 31 0 0
पॉवेल झे.शमी गो.अश्विन 9 16 0 0
बेस्ट पायचीत गो.ओझा 9 17 2 0
ब्राव्हो झे.विजय गो.अश्विन 11 10 2 0
अवांतर : 8. एकूण : 12.2 षटकांत 3 बाद 43 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1-15, 2-28, 3-43. गोलंदाजी : भुवनेश्वर 3-0-4-0, मो.शमी 2-0-7-0, अश्विन 4.2-2-12-2, ओझा 3-1-12-1.