आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chalesi,arshenal,stock City Ahead In English Primier Football

चेल्सी, आर्सेनल, स्टोक सिटीचे इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीगमध्ये आगेकूच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - चेल्सी, आर्सेनल, स्टोक सिटीने विजय मिळवून इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीगमध्ये आगेकूच केली. दुसरीकडे गुणतालिकेत दुस-या स्थानी असलेल्या मँचेस्टर सिटीला पराभवाचा सामना करावा लागला. साउथम्पटनने मँचेस्टर सिटीवर 3-1 ने विजय मिळवला.

चेल्सीची विगानवर मात - गुणतालिकेत तिस-या स्थानी असलेल्या चेल्सीने विगान अ‍ॅथलेटिकचा 4-1 अशा मोठ्या फरकाने पराभव केला. रामिरेस (23 मि.), हेझार्ड (56 मि.), फ्रँक लॅम्पर्ड (87 मि.), मारीन (90 मि.) यांनी केलेल्या सुरेख गोलच्या बळावर चेल्सीने विजय मिळवला.

विगानकडून मालोनेईने 58 व्या मिनिटाला एकमेव गोल केला. रामिरेसने 23 व्या मिनिटाला गोल करून चेल्सीला मध्यंतरापूर्वी 1-0 ने आघाडी मिळवून दिली.

दुस-या लढतीत काझोर्लाने 35 व्या मिनिटाला गोल करून आर्सेनलला सदरलँडवर 1-0 ने विजय मिळवून दिली. पिछाडीवर पडलेल्या सदरलँडला शेवटच्या मिनिटापर्यंत लढतीत बरोबरी मिळवता आली नाही.

मँचेस्टर सिटीचा तिसरा पराभव
साउथम्पटनने लीगमध्ये मँचेस्टर सिटीविरुद्ध सामन्यात धक्कादायक विजय मिळवला. बॅरीने 48 व्या मिनिटाला केलेल्या आत्मघातकी गोलमुळे मँचेस्टर सिटीचा पराभव झाला. सिटीचा हा लीगमधील तिसरा पराभव ठरला. पुचेओन (7 मि.), डेव्हिस (22 मि.) यांनी गोल करून साउथम्पटनला 2-0 ने आघाडी मिळवून दिली होती. दरम्यान, डेझ्कोने 39 व्या मिनिटाला सिटीकडून पहिला गोल केला.दुस-या हाफमध्ये बॅरीने आत्मघातकी गोल करून साउथम्पटनचा 3-1 ने विजय निश्चित केला. पिछाडीवर पडलेल्या सिटीला शेवटपर्यंत गोल करता आला नाही.

स्पर्धेतील निकाल
चेल्सी वि. वि. विगान अ‍ॅथलेटिक 4-1
साउथम्पटन वि. वि. मँचेस्टर सिटी 3-1
स्टोक सिटी वि. वि. रीडिंग 2-1
आर्सेनल वि. वि. सदरलँड 1-0
स्वानसा सिटी वि. वि. क्वीन्स पार्क रेंजर्स 4-1
टॉटेनहॅम वि. वि. न्यूकॅसल युनायटेड 2-1