आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅलेंजर ट्रॉफी: इंडिया ब्ल्यूचा फायनलमध्ये प्रवेश

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - इंडिया ब्ल्यू संघाने एनकेपी साळवे चॅलेंजर ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. या संघाने शुक्रवारी इंडिया रेड संघाला 11 धावांनी पराभूत केले. युवराज सिंग (84), अक्षत रेड्डी (84), मनीष पांडे (70), अभिषेक नायर (नाबाद 75) यांच्या झंझावाती अर्धशतकाच्या बळावर इंडिया ब्ल्यू संघाने सामना जिंकला.

चार विकेट घेणारा विनयकुमार विजयाचा शिल्पकार ठरला. प्रथम फलंदाजी करताना इंडिया ब्ल्यूने 4 बाद 345 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात इंडिया रेडला 49.5 षटकांत 334 धावांपर्यंत मजल मारता आली.इंडिया ब्ल्यूने सलग दुसरा विजय मिळवला. येत्या 29 सप्टेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना इंदुर येथे होणार आहे.