आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Challenges Before Saina, Srikant In BW World Super Series Badminton

सायना, श्रीकांतसमोर आव्हान!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - बीडब्ल्यू वर्ल्ड सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेला बुधवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेच्या किताबासाठी भारताची स्टार सायना नेहवाल आणि युवा खेळाडू के. श्रीकांत सज्ज झाला आहे. मात्र, भारतीय खेळाडूंची स्पर्धेतील वाट फार खडतर आहे. या खेळाडूंना आव्हानाचा सामना करावा लागेल.

ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन सायनाला महिला एकेरीत कठीण ड्रॉ मिळाला आहे. तिला स्पर्धेत अव्वल शिजियान वांगसह कोरियाची ह्यून सुंग आणि यिओन जूच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. पुरुष एकेरीत के. श्रीकांतलाही आव्हान कायम ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल. एकेरीत त्याला यान ओ योर्गेसेनसह केतो मोमोतो व इंडोनेशियाच्या टॉमी सुगियातोविरुद्ध झुंजावे लागेल.