आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Champins League Football News In Marathi, Divya Marathi

चॅम्पियन्स लीग फुटबॉल: लिव्हरपूल, माद्रिद विजयी; बोर्सिया डोर्टमुंडचीही बाजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - ला लीग संपते न संपते तोवर पॅरिसमध्ये फुटबॉलचा थरार सुरू झाला. लिव्हरपूल, बोर्सिया डोर्टमुंडने विजय मिळवले. लुडेगोरेट्ज, अर्सेनलला निसटत्या पराभवाची चुटपूट लागली. दुसरीकडे ला लीगमध्ये दारुण अपयश पदरी येऊनही रियल माद्रिदने कात टाकल्यासारखा खेळ करून दणदणीत विजयाने सुरुवात केली. तर ला लीग गाजवणाऱ्या अ‍ॅटलेटिको माद्रिदचा धक्कादायक पराभव झाला.

ब गटात लिव्हरपूलने लुडेगोरेट्जचा २-१ ने पराभव केला. स्टीव्हन गेरार्डने मोक्याच्या क्षणी गोल करून बाजी उलटवली. त्याआधी बारटोलीने पहिला गोल नोंदवून आघाडी मिळवून दिली होती. चॅम्पियन्स लीगमध्ये २००९ नंतर प्रथमच लिव्हरपूलने विजयी श्रीगणेशा केला. दरम्यान, डोर्टमुंडने अर्सेनलचा २-० ने सफाया केला. सिरो इमोबाईल आणि पीर्रे इमरिकने दणादण गोल करून अर्सेनलची झोळी रिकामीच ठेवली. रियल माद्रिदने ला लीगमधील पराभवाची भरपाई करत बासेलला ५-१ ने लोळवले. तर अ गटात अ‍ॅटलेटिकोचा ऑलिम्पियाकोजने ३-२ ने सुपडा साफ केला. हा पराभव अ‍ॅटलेिटकोसाठी धक्कादायक ठरला.

सर्वोत्तमाची पावती
सामन्याच्या निकालाने सर्वोत्तमाची पावती दिली. लिव्हरपूलने शानदार खेळ केला. त्यांना विजयाचे श्रेय द्यावेच लागेल. गतवर्षी शानदार खेळ केल्यामुळे आताच्या आमच्या निराशाजनक पराभवाने चिंतेत भरच टाकली आहे. ब्रेंडन रॉजर्स, कर्णधार, लुडेगोरेट्ज