17 व्या आशियाई स्पर्धेमध्ये 50 मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्ण कामगिरी करणारा भारतीय लष्कराचा नेमबाज जितू रॉय मायदेशी परतला आहे. इंदौर विमानतळावर भारतीय लष्काराने जितूचे जोरदार स्वागत केले आहे. जितू लष्कारामध्ये मार्क्समॅनशिप युनिटमध्ये नायक सुभेदार आहे.
पुढील लक्ष विश्व चषक : जितू
इंचियोन आशियाई स्पर्धेत आतापावेतो भारताला एकमेव सुवर्ण पदक मिळवून देणारा जितू रॉय म्हणाला की, '
आपले पुढील लक्ष विश्व चषकामध्ये पदक पटकाविणे आहे.'
जितूने 50 मीटर एअर पिस्तूल मध्ये सुवर्ण तर 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सांघिक कास्य पटकाविले आहे.
विजयाचे श्रेय एएमयू युनिटला
जितूने आपल्या विजयाचे श्रेय आर्मी मार्क्समॅनशिप यूनिट (एएमयू) ला दिले आहे. जितू म्हणाला की, 'एएमयूच्या सहकार्यामुळेच मी नेमबाज होऊ शकलो.
जोरदार स्वागत
एअरपोर्टवर भारतीय सैनिकांनी जितूच्या अभिनंदनाचे फलक लावले होते. त्यानंतर सैनिकांनी जितूला खांद्यावर उचलून घेवून त्याच्या गळयामध्ये फुलांच्या माला घातल्या. नंतर त्याला लष्करी छावणीमध्ये नेण्यात आले. आणि मोठ्या उत्साहात त्यावेळी एएमयूचे सीओ कर्नल ललित शर्मा, ले. कर्नल शमशेर जंग, ले. कर्नल दिलीप, सीके चौधरी, सुबेदार राजकुमार चौहान, नायब सुबेदार
संदीप सिंह, भरतसिंह, कलामुद्दीन आणि मोठ्या संख्येने सैनिक उपस्थित होते.
पुढील स्लाइडवर पाहा, जितू रॉयच्या स्वागताची छायाचित्रे..