आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजयपूर- कर्णधार राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स संघाने चॅम्पियन्स लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी विजयाची हॅट्ट्रिक केली. राजस्थानने पर्थ स्कॉचर्सवर 9 गड्यांनी मात करून स्पर्धेत तिसरा विजय मिळवला. या विजयासह राजस्थानने चॅम्पियन्स लीगची उपांत्य फेरी गाठली.
प्रथम फलंदाजी करताना पर्थ स्कॉचर्सने 120 धावा काढल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने एक गड्याच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. अजिंक्य रहाणे (62) आणि संजू सॅमसनने (50) यांच्या अभेद्य 120 धावांच्या भागीदारीच्या बळावर राजस्थानने 16.3 षटकांत सामना जिंकला. रहाणेने 53 चेंडूंत नाबाद 62 धावा काढल्या. 18 धावा देऊन चार विकेट घेणारा केवोन कुपर सामनावीर ठरला.
तत्पूर्वी, राजस्थानच्या कुपर (4/18) आणि फ्युकनर (2/16) यांनी धारदार गोलंदाजी करून पर्थ स्कॉचर्सला निर्धारित 20 षटकांत 120 धावांत रोखले. वोन्सने संघाकडून सर्वाधिक 27 धावा काढल्या.
संक्षिप्त धावफलक
पर्थ स्कॉचर्स : सर्बबाद 120, राजस्थान रॉयल्स : 1 बाद 121
ओटागोचा ‘सुपर’ विजय
जयपूर 2 ओटागोने सुपर ओव्हरमध्ये लायन्सला पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना लायन्सने 4 बाद 167 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात ओटागोने 7 गडी गमावून 167 धावांपर्यंत मजल मारली. सुपर ओव्हरमध्ये ओटागोने बिनबाद 13 धावा काढल्या. लायन्सने दोन गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा काढता आल्या. त्यामुळे सामना पुन्हा टाय झाला. अखेर सर्वाधिक बाउंड्री मारणार्या ओटागोला विजयी घोषित करण्यात आले.
संक्षिप्त धावफलक - लायन्स : 4 बाद 167, ओटागो : 7 बाद 167.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.