आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • South Africa Beats Pakistan By 67 Runs In Champions Trophy

चॅम्पियन्स ट्रॉफी: दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्‍तानवर दणदणीत विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंगहॅम - सामनावीर हाशीम आमलाचे (81) अर्धशतक आणि मॅक्लारेनच्या (4/19) धारदार गोलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने सोमवारी चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानवर 67 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने 9 बाद 234 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकने 167 धावांत गाशा गुंडाळला. पाकचा हा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव ठरला. येत्या शनिवारी पाकची गाठ भारताशी पडणार आहे. मिसबाहचे (55) अर्धशतक व्यर्थ ठरले. आफ्रिकेसमोर 14 जुनला वेस्ट इंडीजचे आव्हान असेल.

दक्षिण आफ्रिकेला सी. इंग्राम व आमलाने दमदार सुरुवात करून दिली. या जोडीने पहिल्या गड्यासाठी 53 धावांची भागीदारी केली. दरम्यान, हाफिजने इंग्रामला (20) पायचीत केले. तिसºया क्रमांकावर आलेल्या डुप्लेसिसने आमलासोबत दुसºया विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. मात्र, डुप्लेसिसला इरफानने बाद केले. त्याने 40 चेंडूंत दोन चौकारांसह 28 धावा काढल्या. त्यानंतर सईद अजमलने हाशीम आमलाला झेलबाद केले. आमलाने 97 चेंडूत नऊ चौकारांच्या साहाय्याने सर्वाधिक 81 धावा काढल्या.

कर्णधार एल्बी डिव्हिलर्सने (31) ड्युमिनीसोबत (24) चौथ्या गड्यासाठी 41 धावांची भागीदारी केली. मिलरने (19) पीटरसनसोबत सातव्या विकेटसाठी 28 धावांची भागीदारी करून संघाला सन्मानजनक स्कोअर उभा करून दिला.

आमलाचे अर्धशतक
द. आफ्रिकेकडून हाशीम आमलाने 97 चेंडूंचा सामना करताना 81 धावा काढल्या. या खेळीत त्याने 9 चौकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट 83.50 असा होता.


संक्षिप्त धावफलक
द. आफ्रिका : 9 बाद 234 धावा (आमला 81, डिव्हिलर्स 31, ड्युमिनी 24) वि.वि.
पाक : 167 धावा(मिसबाह 55, जमशेद 42 )