आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन्स ट्रॉफी : अवघ्या एका विजयासाठी कांगारू तरसले..!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवणारा ऑस्ट्रेलिया संघ आता अडचणीतून जात आहे. गचाळ कामगिरीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतून ऑस्ट्रेलियन टीम एकही सामना न जिंकता बाहेर पडली आहे. या स्पर्धेच्या लीग सामन्यांपुढे या टीमला आगेकूच करता आली नाही. एकही विजय ऑस्ट्रेलियाच्या पदरी पडला नाही.


कधी काळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यास विरोधी संघ घाबरायचे. कांगारूंना खेटण्याचे धाडस पटकन व्हायचे नाही. मात्र, आज ऑस्ट्रेलियासोबत लढताना कोणत्याही संघाला भिती वाटत नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीतील साखळीत इंग्लंड आणि श्रीलंकेने कांगारूंना सहजपणे लोळवले.


जॉर्ज बेली अपयशी
मायकेल क्लार्क पाठीच्या दुखापतीतून अद्याप सावरला नाही. यामुळे पर्यायी म्हणून टीमचे नेतृत्व जॉर्ज बेलीकडे सोपवण्यात आले. मात्र, तो यामध्ये स्वत:ला सिद्ध करू शकला नाही. तसेच टीममध्येदेखील तो आपला वचक निर्माण करू शकला नाही.


वॉटसन फ्लॉप
एकीकडे क्लार्क संघाबाहेर होता आणि ऑस्ट्रेलियाचे दुसरे अव्वल फलंदाज फॉर्मात नव्हते. क्लार्कच्या अनुपस्थितीत शेन वॉटसनकडून सर्वात मोठी आशा होती. मात्र, पूर्णपणे अपयशी ठरला.


वॉर्नरने वाढवली निराशा
मद्यप्राशन करून इंग्लंडच्या ज्यो रूटला मारहाण केल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वॉर्नरवर बंदी घातली. वॉर्नरमुळे संघात दोन गट तयार झाले आहेत. एक गट वॉर्नरचा आणि दुसरा गट क्लार्कसोबत आहे. वॉर्नरच्या प्रकरणाने संघात निराशा वाढवली.


गोलंदाजांनी केली निराशा
ऑस्ट्रेलिया टीममध्ये चांगल्या गोलंदाजांची कमी नाही. मिशेल जॉन्सन, जेम्स फ्युकनर आणि डोहर्थीसारखे अव्वल गोलंदाज संघात आहेत. मात्र, हे गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखण्यात सपशेल अपयशी ठरले. परिणामी संघ फ्लॉप ठरला.


एकजुटीचा अभाव
ऑस्ट्रेलिया टीम पुनर्बांधणीच्या परिस्थितीतून जात आहे. टीमचे युवा खेळाडू अद्याप स्वत:ला सिद्ध करू शकले नाहीत. एकसंध कामगिरीचाही संघामध्ये अभाव असल्याने पराभवाला सामोरे जावे लागत आहे.