आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Champion Trophy: Today Srilank Face Challenge Of England

चॅम्पियन ट्रॉफी: इंग्लंडसमोर आज श्रीलंकेचे तगडे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत अ गटात ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला सामना जिंकणा-या इंग्लंड क्रिकेट संघाला गुरुवारी श्रीलंकेचे आव्हान पेलावे लागेल. हा सामना स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याच्या इराद्याने इंग्लंडची टीम खेळेल. दुसरीकडे स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी श्रीलंकेलाही या सामन्यात विजय आवश्यक आहे.
इंग्लंडने अ गटातील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 48 धावांनी हरवले होते. दुसरीकडे श्रीलंकेला कार्डिफ येथील लढतीत न्यूझीलंडकडून एका विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने कर्णधार अ‍ॅलेस्टर कुकच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयी सुरुवात केली.

मागच्या सामन्यात इयान बेलने शानदार 91 धावांची खेळी केली होती. बेलनेच इंग्लंडला विजयाजवळ पोहोचवले होते. याशिवाय जोनाथन ट्रॉट आणि रवी बोपारा यांनीसुद्धा चांगले प्रदर्शन केले. गरज पडल्यास इंग्लंडचे तळाचे फलंदाजसुद्धा महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात, हे इंग्लिश संघाचे वैशिष्ट्य आहे. दुसरीकडे श्रीलंकेचा संघसुद्धा दमदार आहे. त्यांच्याकडे गोलंदाज आणि फलंदाजांची उत्तम फळी आहे.