आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Champions Hockey Trophy: Pakistan Defeated India By 4 3

चॅम्पियन्स ट्राफी : पाकची भारतावर ४-३ ने मात; जर्मनी अंतिम फेरीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुवनेश्वर - आशियाई सुवर्णपदक विजेता भारत आणि १३ वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचे शनिवारी हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीतील आव्हान संपुष्टात आले. यजमान भारताला पाकने उपांत्य सामन्यात पराभूत केले. तसेच जर्मनीने ऑस्ट्रेलियावर मात केली.जर्मनीने उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३-२ अशा फरकाने सनसनाटी विजयाची नोंद केली. यासह जर्मनीने अंतिम फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. पराभवासह ऑस्ट्रेलियाचे १४ व्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न धुळीत मिळाले.

ओरुझ (५ मि.), ग्रामबुस्च (९ मि.) व फुच (३१ मि.) यांनी केलेल्या गोलच्या बळावर जर्मनीने विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियासाठी सिरील्लो (३४ मि.) व बुडगेओन (४२ मि.) यांनी गोल केले. मात्र, त्यांना पराभव टाळता आला नाही. आता जर्मनी संघाला जेतेपदाची संधी आहे. अंतिम सामन्यातही ही लय कायम ठेवण्याचा जर्मनीचा प्रयत्न असेल.

पाककडून भारताचा धुव्वा!
आशियाई चॅम्पियन भारतीय संघाला शनिवारी उपांत्य सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाने यजमान भारताला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. पाहुण्या पाकिस्तानने उपांत्य लढतीत भारताचा ४-३ अशा फरकाने धुव्वा उडवला. यासह पाकिस्तानने अंतिम फेरीत धडक मारली. आता या संघाचा सामना जर्मनीशी होईल.