आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Champions League Football : Ronaldo Goal Out The United Champions

चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रोनाल्डोच्या गोलमुळे युनायटेड चॅम्पियन्स लीगमधून आऊट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मँचेस्टर - क्रिस्टियानो रोनाल्डोच्या निर्णायक गोलमुळे रिअल माद्रिदने अत्यंत अटीतटीच्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडला 2-1 ने पराभूत करून चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेबाहेर केले.

रिअल माद्रिदची टीम एक वेळ सामन्यात 1-0 ने मागे पडली होती. मात्र, आपल्या खेळाडूंच्या चपळ खेळाच्या बळावर माद्रिदने सामन्यात दमदार मुसंडी मारताना विजयी कामगिरी केली. मँचेस्टर युनायटेडच्या सर्जियो रामोसने सामन्याच्या 48 व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल केला. या गोलमुळे युनायटेडने 1-0 अशी आघाडी घेतली. अवघ्या 8 मिनिटांच्या खेळानंतर युनायटेडला मोठा धक्का बसला. त्यांचा मिडफील्डर नॅनीला पंचांनी रेड कार्ड दाखवल्याने त्याला मैदानाबाहेर जावे लागले. यानंतर दहा खेळाडूंच्या युनायटेडविरुद्ध माद्रिदने आणखी आक्रमक खेळ सुरू केला. सामन्याच्या 60 व्या मिनिटाला माद्रिदच्या एल. मोद्रिकने गोल करून आपल्या टीमला 1-1 अशी बरोबरी करून दिली.

अवघ्या दोन मिनिटांनंतर रोनाल्डोच्या पायाची जादू मैदानावरील उपस्थित प्रेक्षकांना दिसली. रोनाल्डोने सामन्याच्या 69 व्या मिनिटाला निर्णायक गोल करून माद्रिदची आघाडी 2-1 अशी केली. यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंना गोल करता आला नाही. मँचेस्टर युनायटेडने बरोबरीसाठी नंतरही जोरदार प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश मिळू शकले नाही.

सामन्यात मँचेस्टर युनायटेडच्या इवरा आणि कॅटिक या दोघांना पंचांनी यलो कार्ड दाखवले, तर नॅनीला रेड कार्ड दाखवण्यात आले. माद्रिदकडून आरबेआ, काका आणि पेपे या तिघांना पंचांनी यलो कार्ड दाखवले.
नॅनी संघाबाहेर गेल्याने आम्हाला मोठे नुकसान झाले. हा निर्णय अत्यंत कठोर होता, अशी प्रतिक्रिया युनायटेडचे सहायक व्यवस्थापक माइक पेहलान यांनी व्यक्त केली.