आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅसेलच्या दणक्याने लिव्हरपूल स्पर्धेबाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - बॅसेलने केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या बळावर त्यांनी लिव्हरपूलला चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतून बाहेर फेकले. या विजयामुळे बॅसेलचा संघ तसेच ज्युवेन्टस आणि मोनॅकोचे क्लब अंतिम सोळामध्ये दाखल झाले आहेत.

चॅम्पियन्स लीगच्या ब गटातून झालेल्या या सामन्यात लिव्हरपूलला विजय अत्यावश्यक होता. मात्र बॅसेलकडून फॅबियन फ्रेइ याने २५ व्या मिनिटाला केलेला गोल सामन्यात निर्णायक ठरला. त्यात लिव्हरपूलचे खेळाडू त्यांच्या अपेक्षेप्रमाणे खेळ करू न शकल्याने या सामन्यासह त्यांना अंतिम सोळामध्ये पोहोचण्याच्या संधीवरही पाणी सोडावे लागले. दुसरीकडे ज्युवेन्टस आणि मोनॅकोचे क्लब अंतिम सोळामध्ये दाखल झाले आहेत, तर रिअल माद्रिदने त्यांचे विजयी अभियान कायम राखत ४- ० असा विजय मिळवला.

रोनाल्डोने लीगमधील त्याचा ७२ वा गोल करीत लियोनेल मेसीच्या अधिक जवळ सरकला आहे. आता तो मेस्सीपेक्षा केवळ दोन गोलने मागे आहे. दरम्यान एफ गटात बार्सिलोना आणि पॅरिस सेंट जर्मन यांच्यात गटामध्ये अव्वल कोण ते ठरवणारी लढत उद्या रंगणार आहे.