छायाचित्र : गोल केल्यानंतर जल्लोष करताना नासरी.
पॅरिस- समीर नासरीने संघाला शानदार विजय मिळवून देत चॅम्पियन्स लीगमधील
आपल्या अर्धशतकी सामन्यांचा आनंदोत्सव साजरा केला. त्याचा चॅम्पियन्स लीगमधील हा ५० वा सामना होता. मँचेस्टर सिटीने या सामन्यात इटलीच्या रोमवर २-० अशा फरकाने विजय मिळवला. यासह सिटीने लीगच्या अंतिम १६ मध्ये धडक मारली.
पाब्लाे झाबेल्टाने (८६ मि.) संघाच्या विजयात एका गोलचे याेगदान दिले. दुसरीकडे रोम संघाने शेवटच्या मिनिटांपर्यंत दिलेली झंुज सपशेल अपयशी ठरली. शानदार विजयासह इ गटात मँचेस्टर सिटीने गुणतालिकेत दुस-या स्थानावर धडक मारली. या गटात बायर्न म्युनिच १५ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे.
ही रंगतदार लढत पहिल्या हाफमध्ये शून्य गोलने बरोबरीत होती. त्यानंतर दुस-या हाफमध्ये समीर नासरीने सामन्यात गाेलचे खाते उघडले. त्याने ६० व्या मिनिटाला हे यश संपादन केले. यासह त्याने सिटीला सामन्यात १-० ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पाब्लाेने सामना संपण्याला चार मिनिटे शिल्लक असताना गोल केला. यासह सिटीने सामन्यातील आपला एकतर्फी विजय निश्चित केला.
बार्सिलाेना अव्वलस्थानी
नेमारने शानदार गोल करून बार्सिलाेनाला पॅरिस सेंट जमर्रेनविरुद्ध सामन्यात विजय मिळवून दिला. या संघाने ३-१ ने सामना जिंकून एफ गटाच्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. या सामन्यात लियाेनेल मेसी आणि नेमार चमकले. मेसीने १९ व्या मिनिटाला गोल करून बार्सिलाेनाला सामन्यात बराेबरी मिळवून दिली. त्यानंतर नेमार (४१) आणि लुईस सुआरेझ (७७ मि.) यांनी गोल करून बार्सिलाेनाला विजय मिळवून दिला. यासह बार्सिलाेनाने या गटातील आपला दबदबा कायम ठेवला. दुसरीकडे सेंट पॅरिसने सामन्यात विजयासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले.
50 वा सामना नासरी खेळला
2-0 ने मँचेस्टर सिटी विजयी
60 व्या मिनिटाला नासरीचा गाेल