आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Champions League News In Marathi, Football, Manchester United

फुटबॉल: मँचेस्टर युनायटेडसह बोरुसिया डॉर्टमंड उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - रॉबिन वॅन पर्सीने केलेल्या गोल हॅट्ट्रिकच्या जोरावर मॅँचेस्टर युनायटेडने ऑलिम्पियाकोजला 3-0 असे तर बोरुसिया डॉर्टमंडचा संघदेखील चॅम्पियन्स लीगच्या अंतिम आठ संघांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे.
मॅँचेस्टर युनायटेडचा संघ स्पर्धेत सर्वाधिक चमकदार कामगिरी करण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे प्रशिक्षक डेव्हिड मोयेस यांच्यासह मॅँचेस्टरच्या पाठीराख्यांच्या अपेक्षादेखील उंचावल्या आहेत. दुसरीकडे डॉर्टमंडला झेनीत सेंट पीटर्सबर्गबरोबरच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी एकूण कामगिरीच्या बळावर त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यात यश मिळवले आहे.
रॉबिन वॅन पर्सीचा करिष्मा
पर्सीने सामन्याच्या आरंभापासूनच काही अफलातून कामगिरी केली. रुनीच्या पासवर पर्सीने पहिला गोल लगावत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पूर्वार्धातच दुसरा गोल करीत मॅँचेस्टर युनायटेडला विजयी आघाडी मिळवून दिली. 52 व्या मिनिटाला
मिळालेल्या फ्री किकवर सामन्यातील वैयक्तिक आणि संघाचा तिसरा गोल लगावत हॅट्ट्रिक पूर्ण केली.
मोयेसनी व्यक्त केले समाधान
चॅम्पियन्स फुटबॉल लीगमध्ये आता संघाला पुन्हा चांगला सूर सापडू लागला असून ही अत्यंत समाधानाची बाब असल्याचेही मॅँचेस्टरचे संघ व्यवस्थापक डेव्हिड मोयेस यांनी म्हटले आहे. रविवार झालेलेल्या सामन्यातील पराभवानंतर आमच्या संघाने जणू कात टाकली आहे. आता अशा प्रकारचा खेळ सगळ्यांनाच आनंद देणारा असतो, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.