आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Champions League News In Marathi, Real Madrid, Divya Marathi

चेल्सी, रिअल माद्रिदची अंतिम आठमध्ये धडक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - चेल्सी आणि रिअल माद्रिदच्या संघांनी चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत सहजपणे प्रवेश केला. चेल्सीने गॅलटसॅरायवर, तर क्रिस्टियानो रोनाल्डोच्या दुहेरी गोलच्या कामगिरीमुळे रिअल माद्रिदने शॉल्कवर मात करीत अंतिम आठमध्ये धडक मारली आहे.


चेल्सीविरुद्ध गॅलटसॅरायच्या सामन्यात पूर्वार्धात 2-0 अशी आघाडी मिळवली होती. चेल्सीकडून सॅम्युअल इटो आणि गॅरी काहील यांच्या प्रत्येकी एक गोलचा समावेश आहे. अखेर चेल्सीने हा सामना एकतर्फी जिंकला. अखेरच्या टप्प्यात चेल्सीची कामगिरी उंचावेल, असा विश्वास संघाचे प्रशिक्षक मोरीन्हो यांनी व्यक्त केला.


माद्रिदही विजयी
रिअल माद्रिदच्या क्रिस्टियानो रोनाल्डोवर केलेले दोन गोल निर्णायक ठरले. हा सामना रिअल माद्रिदने 3-1 असा जिंकत तब्बल 31 सामने अजिंक्य राहण्याची अनोखी कामगिरी केली आहे. आता आम्ही अखेरच्या सर्वोत्कृष्ट आठ संघांमध्ये पोहोचलो असून यापुढची कामगिरी महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रशिक्षक अ‍ॅनसोलेट्टी यांनी सांगितले.