आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन्स लीग टी-20: चेन्नई सुपरकिंग्ज विजयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - प्रथमच घरच्या मैदानावर टी-20 सामना खेळणा-या कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (7) चेन्नई सुपरकिंग्जला विजय मिळवून दिला. या संघाने सामन्यात टायटन्सचा 4 गड्यांनी पराभव केला. यजमान संघाने रविवारी चॅम्पियन्स लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेला शानदार विजयाने सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना टायटन्स संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 185 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात धोनीच्या चेन्नईने 18.5 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.


धावांचा पाठलाग करणा-या चेन्नईकडून सलमीवीर हसी व सुरेश रैनाने (47) दुस-या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली. हसीने 26 चेंडूंत सात चौकार व एका षटकारासह 47 धावा काढल्या. त्यानंतर ब्राव्हो (38) आणि बद्रीनाथने चौथ्या गड्यासाठी 58 धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. ब्रदीने 20 चेंडूंत दोन चौकार ठोकून नाबाद 20 धावा काढल्या. गोलंदाजीत वान डर मर्वे, मोर्कल, रिचर्डस आणि विसेईने प्रत्येकी एक विकेट घेतली.


तत्पूर्वी, सलामीवीर कर्णधार हेन्री डेव्हिडस व रुडोल्फने 46 धावांची भागीदारी करताना टायटन्सला दमदार सुरुवात करून दिली. दरम्यान, रुडोल्फ धावबाद झाला. त्याने 17 चेंडूंत चार चौकारांसह 21 धावांची खेळी केली. तिस-या क्रमांकावर आलेल्या एल्बी डिव्हिलर्सने कंबर कसली. त्याने डेव्हिडसोबत दुस-या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. डेव्हिडने 43 चेंडूंत चार चौकार व दोन षटकारांच्या साह्याने 52 धावा काढल्या. त्याला आर. अश्विनने बाद केले. डिव्हिलर्सने 36 चेंडूंत 77 धावा काढल्या. गोलंदाजीत डी. ब्राव्होने 34 धावा देत दोन विकेट घेतल्या. आर. अश्विन व रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक गडी बाद केला.


संक्षिप्त धावफलक
टायटन्स : 5 बाद 185 (डेव्हिड 52, डिव्हिलर्स 77, 2/34 ब्राव्हो) चेन्नई : 6 बाद 187 (हसी 47, रैना, 47, ब्रदीनाथ नाबाद 38, मोर्कल नाबाद 4)