आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Champions League T 20 News In Marathi, Divya Marathi

चॅम्पियन्स लीग टी-२० : मुंबई, लाहोरपैकी एका संघाला मुख्य फेरीची संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - चॅम्पियन्स लीग टी-२० मध्ये मंगळवारी दोन पात्रता फेरीचे सामने रंगतील. पहिला सामना दुपारी चार वाजता लाहोर लायन्स वि. सदर्न एक्स्प्रेस यांच्यात होईल. दुसरा सामना रात्री आठ वाजता मुंबई इंडियन्स-नॉर्दर्न नाइट्स यांच्यात रंगेल. क्वािलफाइंग फेरीतील चार संघांपैकी दोन संघ मुख्य फेरीत प्रवेश करतील.
न्यूझीलंडच्या नाइट्सने मुख्य फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. दुसरीकडे सलग दोन पराभवांनंतर श्रीलंकेचा सदर्न एक्स्प्रेस जवळपास स्पर्धेतून बाहेर झाला आहे. यामुळे आता गतचॅम्पियन मुंबई इंिडयन्स आणि लाहोर यांच्यापैकी एक संघ मुख्य फेरीत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.
लाहोरचा सामना आधी होणार असल्याने त्यांच्यावर अधिक दबाव असेल. त्यांना आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत सामना िजंकावाच लागेल. इतकेच नव्हे तर विजयानंतरसुद्धा लाहोरला मुंबई इंडियन्सच्या सामन्याची प्रतीक्षा करावी लागेल. पाकच्या लाहोर लायन्स संघाचा पराभव झाला तर मुंबई इंिडयन्सचे काम सोपे होईल. अशा परिस्थितीत मुंबई इंिडयन्स विजय न िमळवतासुद्धा मुख्य फेरीत पोहोचू शकतो. लाहोरने विजय िमळवला तर मुंबईलासुद्धा विजय िमळवावा लागेलच. तसे बघितले तर रनरेटच्या बळावर सदर्न एक्स्प्रेससुद्धा मुख्य फेरीत प्रवेश िमळवण्यासाठी प्रयत्न करेल. चुकून लाहोर आणि मुंबई या दोघांचा पराभव झाला तर या सर्व संघांचे प्रत्येकी चार गुण होतील. अशा परिस्थितीत लीगच्या मुख्य फेरीतील पात्र संघाचा निर्णय रनरेटच्या आधारे होईल.
गुणतािलका
संघ सामने विजय/पराभव गुण रनरेट
नॉर्दर्न नाइट्स ०२ २/0 ०८ +२.६८४
मुंबई इंिडयन्स ०२ १/१ ०४ +०.४९८
लाहोर लायन्स ०२ १/१ ०४ -१.४९६
सदर्न एक्स्प्रेस ०२ ०/२ ०० -१.६७०
कामगिरीत सुधारणेची गरज
आम्ही सदर्न एक्स्प्रेसविरुद्ध िजंकलो असलो तरीही आम्हाला आमच्या कामगिरीत सुधारणेची गरज आहे. आम्हाला विशेषत: गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात सुधारणेची खूप संधी आहे.
- केरोन पोलार्ड, मुंबई इंिडयन्सचा कर्णधार.