हैदराबाद -
गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्स संघाने रविवारी चॅम्पियन्स लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत सलग दुस-या विजयाची नोंद केली. या संघाने
आपल्या दुस-या सामन्यात पाकच्या लाहोर लायन्सवर ४ गड्यांनी मात केली.
गाैतम गंभीर (६०) आणि रॉबिन उथप्पा (४६) यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर कोलकाता संघाने १९.३ षटकांत सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना लायन्स संघाने ७ बाद १५१ धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात आयपीएल चॅम्पियन केकेआर संघाने सहा गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. कोलकाता संघाकडून रेयान डोश्चे १२, सूर्यकुमार यादव नाबाद १४ आणि युसूफ पठाणने ११ धावांची खेळी केली. तत्पूर्वी, लायन्सला जमेशद (१०) व शहजाद (५९) यांनी अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली होती. केकेआरकडून नरेनने तीन बळी घेतले.