मोहाली - किंग्ज इलेव्हन पंजाब
आपल्या घरच्या मैदानावर चॅम्पियन्स लीग टी-२० मध्ये पदार्पणासह नव्या दमाने सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. िकंग्ज पंजाबला गुरुवारी कांगारूंचा संघ हॉबर्ट हरिकेन्ससोबत लढायचे आहे. ऑस्ट्रेिलयन संघ पूर्ण जोशात असून दोन्ही संघांचा सामना म्हणजे हायहोल्टेज लढत असेल.
पंजाबने आयपीएल-७ मध्ये सर्वांना चकित करणारी कामगिरी करताना उपविजेतेपद पटकावले होते. पंजाबचे खेळाडू ट्रॉफी िजंकण्याच्या इराद्याने खेळतील. दुसरीकडे हॉबर्ट संघाची स्थितीसुद्धा सारखीच आहे. हॉबर्टला िबग बॅश टी-२० च्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांना पर्थ स्कॉचर्सने हरवले होते. िकंग्ज इलेव्हनला पंजाबने मात िदली होती. आता दोन्ही संघांकडे नव्या स्पर्धेत िवजयाने सुरुवात करण्याची चांगली संधी आहे.
कांगारू िव. कांगारू लढत अशी रंगणार
दोन्ही संघांतील ही लढत यामुळेही महत्त्वाची आहे. कारण हा सामना कांगारू िव. कांगारू असा रंगेल. दोन्ही संघांचे कर्णधार ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत. हॉबर्ट संघाचा कर्णधार टीम पेन असून पंजाबची मदार जॉर्ज बेलीकडे आहे. बेलीकडे तर त्याच्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्वसुद्धा आहे. दोन्ही कर्णधार आपले श्रेष्ठत्वसिद्ध करण्यासाठी झुजतील.
जॉन्सनच्या अनुपस्थितीत परेराकडून आशा
विरोधी फलंदाजांना अडचणीत आणण्यासाठी मिशेल जॉन्सनचे नाव पुरेसे आहे. मात्र, तो संघासोबत नाही. त्याच्या अनुपस्थितीत श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू तिसरा परेराकडून संघाला आशा आहे. परेरा चांगल्या लयीत असून त्याने पाकविरुद्ध शानदार गोलंदाजी केली होती. तो त्या मॅन ऑफ द सिरीजही ठरला होता. त्याची कामगिरी महत्वाची ठरेल.
दमदार गोलंदाजी : ऑस्ट्रेलियन संघाची गोलंदाजी नेहमीच दमदार रािहली आहे. त्यांच्याकडे बेन हिल्फेनहॉस, डग बोलिंजरसारखे तुफानी गोलंदाज आहेत. शिवाय डोहर्ती, शोएब मलिकच्या रूपाने फिरकीपटूही आहेत. टीम पेन फलंदाजीत माहिर आहे. याशिवाय कॅमरून बॉयस, ट्रेिव्हस बर्टन आणि ब्लिजार्ड यांच्यावर ऑस्ट्रेलियन संघाची मदार असेल.
शोएब मलिकवर हॉबर्टची मदार
हॉबर्ट हरिकेन्ससाठी पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक आहे. भारतीय खेळपट्ट्यांचा अनुभव असलेले बरेच खेळाडू हॉबर्टकडे आहेत. मात्र, यात शोएब मलिक सर्वात अनुभवी आहे. येथे कसे खेळायचे हे त्याला चांगले माहिती आहे. हॉबर्टची मदार शोएब मलिकवरच असेल.
सेहवाग-मॅक्सीकडून असेल आशा
आयपीएलमध्ये आपल्या दमदार प्रदर्शनाने स्फोटक फलंदाजी करणारे वीरेंद्र सेहवाग आणि ग्लेन मॅक्सवेलकडून िकंग्ज पंजाबला या वेळीसुद्धा दमदार प्रदर्शनाची आशा असेल. या दोघांची बॅट तळपली तर विरोधी संघांना बॅकफूटवर जावे लागेल. या दोन्ही फलंदाजांच्या बॅटने धमाका केला तर चेंडू जवळपास सीमारेषेबाहेरच िदसतो. याची हॉबर्ट संघालाही चांगली जाणीव आहे. यामुळे या दोन खेळाडूंना रोखण्याची विशेष रणनीती हॉबर्ट संघ तयार करीत आहे. या दोघांशिवाय दमदार फिनिशर म्हणून िकलर मिलरला ओळखले जाते. मिलरने अनेक वेळा पंजाबला थरारक विजय मिळवून िदला आहे. त्याच्याकडून अशाच प्रदर्शनाची आशा असेल.