आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Champions League T 20: Today Matches Between Mumabi Rajasthan

चॅम्पियन्स लीग टी-20 : मुंबई-राजस्थान आज सामना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - चॅम्पियन्स लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेला शनिवारपासून प्रारंभ होत आहे. राजस्थान रॉयल्स व मुंबई इंडियन्स यांच्यात या स्पर्धेचा उद्घाटनपर सामना होणार आहे. हा सामना एसएमएस स्टेडियमवर रात्री 8 वाजता खेळवला जाईल. सामन्यात विजय मिळवून फिक्सिंगमुळे गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवण्याचा राजस्थान संघाचा प्रयत्न असेल. आयपीएल-6 दरम्यान राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडू फिक्सिंग प्रकरणात अडकले आहेत. त्यामुळे हा सुपरहिट सामना जिंकण्यावर राजस्थानचा अधिक भर असेल.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू शेन वॉटसनकडे राजस्थान रॉयल्स संघाची महत्त्वाची जबाबदारी असेल. मागील सत्रात त्याने 142.89 च्या सरासरीने सर्वाधिक 543 धावा काढल्या होत्या. तसेच त्याने 13 विकेटही घेतल्या होत्या. सिद्धार्थ त्रिवेदीच्या अनुपस्थितीमुळे गोलंदाजीची जबाबदारी त्याच्याकडे सोपवण्यात आली आहे.

मुंबई इंडियन्सची मजबूत बाजू
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या मुंबई इंडियन्स संघाचे पारडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, केरोन पोलार्ड आणि मिशेल जॉन्सन, हरभजन सिंग आणि प्रज्ञान ओझामुळे अधिक जड आहे. हरभजनला लीगमध्ये चमकदार कामगिरी करून टीम इंडियात पुनरागमन करण्याची संधी आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मलिंगाची अनुपस्थिती हीच मुंबईची सर्वात मोठी दुबळ बाजू ठरणार आहे.


सरप्राइज पॅकेज
राजस्थानला लकी मैदान
हे मैदान राजस्थान रॉयल्ससाठी अधिक लकी आहे. आयपीएल-6 मध्ये द्रविडच्या राजस्थान संघाने या मैदानावरील सर्व सामने जिंकले होते.


राजस्थान रॉयल्स
राहुल द्रविड (कर्णधार), स्टुअर्ट बिन्नी, केवन कुपर, जेम्स फुकनर, ब्रॅड हॉग्ज, विक्रमजित मलिक, अशोक मनेरिया, अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन, राहुल शुक्ला, शवून ताईत, प्रवीण तांबे


25 लाख डॉलर विजेत्या टीमला मिळणार
13 लाख डॉलर उपविजेत्या टीमला मिळणार
5 लाख डॉलर उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या टीमला
2 लाख डॉलर ग्रुप सामन्यांपर्यंत खेळणार्‍या संघाला
मिका सिंगच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा रंगणार
द्रविड, सचिन तेंडुलकरच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्षफैसलाबाद, ओटागो विजयी
पाकिस्तानच्या फैसलाबाद वुल्व्हज व ओटागोने शुक्रवारी चॅम्पियन्स लीग टी-20 पात्रता फेरीतील शेवट गोड केला. फैसलाबादने श्रीलंकेच्या कंडुराता मॅरुन्सचा 10 धावांनी पराभव केला. फैसलाबादने 6 बाद 146 धावा काढल्या होत्या. कंडुराताला 7 गड्यांच्या मोबदल्यात 136 धावांपर्यंत मजल मारता आली. ओटागोने सनरायझर्स हैदराबादला 5 विकेटने हरवले. मात्र, हे दोन्ही संघ पात्रता फेरीतून बाहेर पडले आहेत.


25 लाख डॉलर विजेत्या टीमला मिळणार
13 लाख डॉलर उपविजेत्या टीमला मिळणार
5 लाख डॉलर उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या टीमला
2 लाख डॉलर ग्रुप सामन्यांपर्यंत खेळणार्‍या संघाला
मिका सिंगच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा रंगणार
द्रविड, सचिन तेंडुलकरच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष