आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लायन्ससमोर आज केकेआरचे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - मोहंमद हाफिजच्या लाहोर लायन्ससमोर रविवारी चॅम्पियन्स लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत आयपीएल चॅम्पियन कोलकाता नाइट रायडर्सचे तगडे आव्हान असेल. हैदराबादच्या मैदानावर रात्री आठ वाजेपासून या सामन्याला सुरुवात होईल. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली लीगमध्ये सलग दुसऱ्या विजयासाठी केकेआरचा संघ सज्ज झाला आहे. या संघाने चेन्नई सुपरकिंग्जला नमवून लीगमध्ये विजयी सलामी दिली.
कोबरास- हरिकेन्स झुंजणार
रविवारी दुपारी ४ वाजेपासून केप कोबरास आणि हॉबर्ट हरिकेन्स यांच्यातील सामन्याला सुरुवात होईल. या दोन्ही संघाला सलामी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यातून चॅम्पियन्स लीगमध्ये विजयाचे खाते उघडण्याचा या संघांचा प्रयत्न असेल. पंजाबच्या किंग्ज इलेव्हन संघाने सलामीच्या लढतीत हॉबर्ट हरिकेन्सचा पराभव केला. दुसरीकडे न्यूझीलंडच्या नॉर्दर्न नाइट्सने केप कोबरासवर मात केली.
आजचे सामने
*केप कोबरास वि. हॉबर्ट हरिकेन्स
स्थळ : हैदराबाद, दुपारी ४.०० वा.

*कोलकाता वि. लाहोर लायन्स
स्थळ : हैदराबाद, रात्री ८.०० वा.

रस्सेलवर सर्वांची नजर
सलामी सामन्यातील विजयाचे शिल्पकार ठरलेला कोलकात्याचा रेयान डोश्चे व आंद्रे रस्सेलवर खास नजर असेल. या दोन्ही खेळाडूंनी अर्धशतकाच्या बळावर केकेआरला विजय मिळवून दिला.