रायपूर - पोलार्डच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेच्या पात्रता फेरीत दमदार पुनरागमन केले. मुंबई संघाने रविवारी श्रीलंकेच्या सदर्न एक्स्प्रेसला राेखून पात्रता फेरीची विजयी ट्रॅक गाठली. मुंबईने ९ गड्यांनी सामना जिंकला. सिमन्स (नाबाद ७६) आणि एम. हसी (६०) यांच्या शानदार शतकी भागीदारीच्या बळावर मुंबईने १६.२ षटकांत विजय साकारला. मुंबईचा स्पर्धेतील हा पहिला विजय ठरला. याशिवाय सदर्नचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव झाला.
प्रथम फलंदाजी करताना सदर्न एक्स्प्रेसने ६ बाद १६१ धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने एका गड्याच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. एल. सिमन्सने संघाच्या विजयात नाबाद ७६ धावांचे याेगदान दिले. याशिवाय हसीने शानदार अर्धशतक झळकावले. पोलार्डने २० धावांची खेळी करून संघाचा विजय नशि्चित केला. तत्पूर्वी, सदर्नकडून महरूफने सर्वािधक ४१, गुनातिलकाने ३० धावा काढल्या.
मुंबई-नाॅर्दर्न आज लढत
मुंबई इंडियन्सला सलामी सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. साेमवारी मुंबई व नाॅर्दर्न नाइट्स यांच्यात सामना रंगणार आहे. तसेच लाहोर-सदर्न समोरासमोर असतील.
नाॅर्दर्न नाइट्सचा दुसरा विजय
जबरदस्त फाॅर्मात असलेल्या नाॅर्दर्न नाइट्सने चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेच्या पात्रता फेरीत सलग दुसऱ्या विजयाची नाेंद केली. न्यूझीलंडच्या या संघाने रविवारी माेहंमद हाफिजच्या लाहाेर लायन्सचा ७२ धावांनी पराभव केला. यापूर्वी नाॅर्दर्न नाइट्सने शनिवारी श्रीलंकेच्या सदर्न एक्स्प्रेसचा पराभव केला. दुसरीकडे लाहाेरचा या स्पर्धेतील पहिला पराभव ठरला. यापूर्वी लाहाेर लायन्सने मुंबईवर मात केली हाेती. प्रथम फलंदाजी करताना नाॅर्दर्न नाइट्सने ६ गड्यांच्या माेबदल्यात लाहाेर लायन्ससमाेर विजयासाठी १७१ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात लायन्सचा १८ षटकांत अवघ्या ९८ धावांत खुर्दा उडाला.