आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसर्‍यांदा चॅम्पियन्स लीग टी-20 चा थरार भारतात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतामध्ये तिसर्‍यांदा चॅम्पियन्स लीग टी-20 क्रिकेट लीगचे आयोजन केले जाणार आहे. ही स्पर्धा 17 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरदरम्यान आयोजित केली जाईल. या लीगमध्ये एकूण 29 सामने होतील. स्पर्धेतील बक्षिसाची रक्कम 60 लाख डॉलर करण्यात आली.

यापूर्वी भारतात 2009 आणि 2011 मध्ये या लीगचे आयोजन करण्यात आले होते. चॅम्पियन्स लीग गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी स्पर्धेची माहिती दिली. ते म्हणाले की, 2009 चा उपविजेता त्रिनिदाद अँड टोबेगोला यंदा गु्रप स्टेजच्या सामन्यात थेट प्रवेश देण्यात आला. त्रिनिदादची टीम 2011 आणि 2012च्या क्वालिफायर फेरीपर्यंत पोहोचली होती. कॅरेबियन टी-20 चा विजेता या नात्याने त्रिनिदाद या वर्षी मुख्य ड्रॉमध्ये खेळण्याचा दावेदार आहे. या फेरीत चार संघ सहभागी होतील. यामध्ये आयपीएल-6 ची चौथी रँक टीम, न्यूझीलंडची एचआरव्ही कप चॅम्पियन टीम, ओटागो वोल्टस तथा श्रीलंका आणि पाकमधील देशांतर्गत टी-20 स्पर्धेतील विजेत्या संघाचा समावेश असेल. सर्व संघ एकमेकांमध्ये सामने खेळतील. यामधील अव्वल दोन संघ गु्रप स्टेजमध्ये प्रवेश मिळवतील. तिसर्‍यांदा यजमान पद स्वीकरणार्‍या बीसीसीआयो स्पर्धा यशस्वी करण्याचा विश्वास या वेळी व्यक्त केला.

चॅम्पियन्स लीगचे विजेते
2009- न्यू साऊथवेल्स,
2010- चेन्नई सुपरकिंग्ज, 2011- मुंबई इंडियन्स,
2012- सिडनी सिक्सर्स

हे संघ सहभाग होतील
गु्रप ए : (5 संघ) 1.आयपीएल-सह विजेता संघ, 2. आयपीएल-6 ची तिसरी रँक टीम, 3. दक्षिण आफ्रिकेच्या रॅम स्लॅम टी-20 चॅलेंज विजेता हायवेल्ड लॉयन्स संघ, 4. बिग बॅश लीग उपविजेता पर्थ स्क्रोचर्स संघ, 5. चॅम्पियन्स लीग 2013 ची क्वालिफायर दुसरी रँक टीम.

ग्रुप बी- पाच संघ
1.बिग बॅश चॅम्पियन ब्रिस्बेन हिट, 2.वेस्ट इंडीज टी-20 चॅम्पियन त्रिनिदाद अँड टोबेगो, 3. आयपीएल-6चा उपविजेता संघ, 4. रॅम स्लॅम टी-20 स्पर्धेचा उपविजेता संघ टायटन्स आणि 5. चॅम्पियन लीग 2013 ची क्वालिफायर दुसरी रँकिंग टीम. या सर्व संघांचा आगामी चॅम्पियन्स टी-20 लीगमध्ये समावेश असणार आहे.