आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Champions League: Today Match Between KKR Chennai, Divya Marathi

चॅम्पियन्स लीग : केकेआर-चेन्नई आज झुंज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - चॅम्पियन्स लीग क्रिकेटचा फायनल महामुकाबला दोन भारतीय संघ कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध (केकेआर) चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात शनिवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर सायंकाळी ७ वाजता खेळला जाईल. केकेआर आयपीएल सातचा विजेता आहे. जर त्यांनी विजय मिळवला, तर एकाच वर्षात दुहेरी विजेतेपद मिळवणारा आयपीएलचा पहिला संघ ठरेल. केकेआरने गत सलग १४ लढती जिंकल्या आहेत.
दुसरीकडे केकेआरचे आव्हान पेलण्यास समर्थ असल्याचे चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार धोनीने म्हटले. मात्र, चेन्नईला गेल्या चार लढतींत दोन वेळा पराभूत व्हावे लागले आहे.

केकेआरचे स्टार : रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, कॅलिस, गौतम गंभीर, युसूफ पठाण, पीयूष, आंद्रे रसेल.
चेन्नईचे स्टार : धोनी, रवींद्र जडेजा, स्मिथ, अश्विन आणि मोहित शर्मा.