बंगळुरू - मागील सामन्यात मिळालेल्या सहज विजयाची लय कायम राखण्यास चेन्नई सुपरकिंग्जचा संघ उत्सुक असून गुरुवारी लाहोर लायन्सविरुद्ध होणा-यासामन्यात तशाच कामगिरीची संघाला अपेक्षा आहे.डॉल्फिनविरुद्धच्या सामन्यात अवघ्या ४३ चेंडूंत ९० धावांची खेळी करणा-यासुरेश रैनाकडून कप्तान महेंद्रसिंग धोनीला पुन्हा तशाच खेळीची अपेक्षा राहणार आहे.
सहा गडी गमावत वीस षटकांत २४२ धावा कुटणा-या चेन्नईच्या संघाला पाकच्या संघाविरुद्ध परत तशाच प्रकारचा आक्रमक खेळ करावा लागणार आहे. ड्वेन स्मिथ गत दोन सामन्यांत चांगली कामगिरी करू शकला नसला तरी या सामन्यात तो चांगली खेळी करण्याच्या अपेक्षेने मैदानात उतरेल. चेन्नईचे अन्य सर्व फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने त्यांना फलंदाजीची फारशी चिंता करण्याची गरज उरलेली नाही. दुसरीकडे मोहित शर्मा, आशिष नेहरा आणि डायने ब्रावो तसेच अश्विनदेखील उत्कृष्ट गोलंदाजी करीत असल्याने चेन्नईचा संघ अधिक संतुलित आहे.