आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन्स ट्रॉफी: यष्टिरक्षकांना सामन्यात गोलंदाजीचा मोह आवरेना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने यष्टिरक्षकाची जबाबदारी दिनेश कार्तिकवर सोपवून गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत अवघ्या 17 धावा दिल्या. धोनीने यापूर्वी कसोटीत आणि 2009 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येदेखील गोलंदाजी केली होती. 2009 मध्ये त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध दोन षटके टाकली होती आणि 14 धावा देऊन एक गडीही बाद केला होता.


या यष्टिरक्षकांनी केली गोलंदाजी
मार्क बाऊचर (द.आफ्रिका) :2005 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध गोलंदाजी केली. त्याने 1.2-0-6-1 अशी कामगिरी केली.
ज्योफ मार्श (ऑस्ट्रेलिया) : भारतविरुद्ध त्याने 1-0-4-0 अशी गोलंदाजी केली होती.
कुमार संगकारा (श्रीलंका) : तीन कसोटीत 13 षटकांत 42 धावा दिल्या. मात्र, त्याला एकही गडी बाद करता आला नाही.
स्टुअर्ट (इंग्लंड) : दोन कसोटीत 3.2-0-13-0 अशी गोलंदाजी केली.
वसीम बारी (पाकिस्तान) : एका कसोटीत इंग्लंडविरुद्ध 1-0-2-0 अशी गोलंदाजी केली.
बी. मॅक्लुम (न्यूझीलंड) : 2010 मध्ये अहमदाबाद कसोटीत भारताविरुद्ध 6-1-18-0 ने गोलंदाजी केली.
रशीद लतीफ (पाकिस्तान) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत 2-0-10-0 अशी गोलंदाजी केली.
किरमाणीला मिळाली विकेट : यष्टिरक्षक सय्यद किरमाणीने 1983 मध्ये नागपूर कसोटीत पाकविरुद्ध लढतीत एक गडी बाद केला होता.
तैबू : झिम्बाब्वेचा यष्टिरक्षक तैबूने लंकेविरुद्ध कसोटीत एक व वनडेमध्ये दोन गडी बाद केले.