आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Champions Trophy: Indian Hockey Ready For Semi Final Round

चॅम्पियन्स ट्रॉफी: उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी भारतीय हॉकी संघ सज्ज!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुवनेश्वर - हॉलंडवर तब्बल तीन दशकांनंतर मिळालेल्या विजयामुळे आत्मविश्वासाने मुसमुसलेला भारतीय संघ बेल्जियमला हरवून उपांत्य फेरीत पोहोचण्यास सज्ज झाला आहे. हीरो चॅम्पियन्स हॉकी चषकाच्या या सामन्याकडे भारतातील सर्व हॉकीप्रेमींचे लक्ष लागले आहे.
प्रारंभिक सामन्यांमध्ये भारताने निराशाजनक कामगिरी केली. त्यात प्रारंभीच्या सामन्यात भारताने जर्मनीविरुद्ध अखेरच्या मिनिटात १- ० असा पराभव पत्करला होता, तर दुस-या सामन्यात अर्जेंटिनाविरुद्ध भारताने २- ४ असा मोठ्या फरकाने पराभव स्वीकारला होता.

आजचे सामने
- हॉलंड विरुद्ध पाकिस्तान
वेळ : सकाळी ११.३० वाजेपासून
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध अर्जेंटिना
वेळ : दु. १.४५ वाजेपासून
- इंग्लंड विरुद्ध जर्मनी
वेळ : सायं. ५.१५ वाजेपासून
- भारत विरुद्ध बेल्जियम
वेळ : रात्री ७.३० वाजेपासून