आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Champions Trophy: Is It India Take Reveng Of Defeating ?

चॅम्पियन्स ट्रॉफी: टीम इंडिया करणार पराभवाची परतफेड ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेविरुद्ध सामना जिंकून भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. यासह धोनी ब्रिगेड रविवारी बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध होणा-या अंतिम सामन्यासाठी सज्ज आहे. या सामन्यात विजेतेपदासह धोनी ब्रिगेडचा 2011 मध्ये कसोटी व वन डे मालिकेत मिळालेल्या पराभवाची इंग्लंडला परतफेड करण्याचा प्रयत्न असेल.


भारतीय संघासाठी धोनीच्या नेतृत्वाखाली 2011 मध्ये केलेला इंग्लंड दौरा हा फारच निराशाजनक ठरला होता. यामध्ये भारताला एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही. आता भारतीय संघाला इंग्लंडकडून मिळालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची सुवर्ण संधी आहे. टीम इंडिया सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जबरदस्त फॉर्मात आहे. या उत्साहास धोनी ब्रिगेड इंग्लंडच्या टीमला दौ-यात झालेल्या पराभवाची सहजपणे परतफेड करू शकते.


कसोटी मालिकेत पराभव
इंग्लंड दौ-यात भारताला या मालिकेत 0-4 ने पराभवाचा सामना करावा लागला. पाच वनडे सामन्यांची मालिका भारताने 0-3 ने गमावली होती. भारताने लॉडर््सवर पहिली कसोटी 196 धावांनी, नॉटिंगहॅम येथे दुसरी कसोटी 319 धावांनी, बर्मिंगहॅम येथे तिसरी कसोटी डाव व 242 धावांनी, ओव्हल येथे चौथ्या कसोटीत डाव व आठ धावांनी पराभव पत्कारला होता.


भारतीय संघ जबरदस्त फॉर्मात


युवांची दमदार कामगिरी
या दौ-याच्या दोन वर्षांनंतर सध्याच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या युवा टीमने अपेक्षेप्रमाणे सुरेख कामगिरी केली. यासह भारताला सर्व सामने जिंकून दिले. भारताने या स्पर्धेच्या दोन्ही सराव सामन्यांत श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियावर मात केली होती. गटातील सामन्यात दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानविरुद्ध भारताने एकतर्फी विजय मिळवला. तसेच उपांत्य सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर मात केली. आता यजमान इंग्लंडची वेळ आहे.


अनेकांच्या कारकीर्दीवर गदा
या दौ-यामुळे भारतीय संघातील अनेकांच्या कारकीर्दीवर गदा आली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौ-यानंतर राहुल द्रविडने निवृत्ती जाहीर केली. व्ही.व्ही.एस.लक्ष्मणलादेखील निवृत्ती घेण्यास भाग पाडले. वेगवान गोलंदाज जहीर खानला विश्रांती देण्यात आली. फिरकीपटू हरभजनसिंगलाही याचा मोठा फटका बसला. तसेच गौतम गंभीरलाही बाहेर राहावे लागले.


दोन वर्षांत दोन ट्रॉफी?
रविवारचा दिवस हा भारतीय संघासाठी ऐतिहासिक कामगिरीची नोंद करणारा आहे. अकरा वर्षांनंतर भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. या सामन्यातील विजयासह टीम इंडिया इंग्लंडला पराभवाची परतफेड करून विश्वचषकापाठोपाठ चॅम्पियन्स ट्रॉफीचा बहुमान पटकावेल.


वनडे मालिकेतही अपयश
भारत-इंग्लंड मालिकेतील पहिला वनडे पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर भारताने साऊथम्पटन येथे दुसरा वनडे 7 गड्यांनी व ओव्हल येथे तिसरा वनडे 3 गड्यांनी गमावला होता. लॉडर््सवरचा चौथा वनडे टाय झाला होता. कार्डिफवर इंग्लंडने पाचव्या वनडेत भारतावर मात केली. मँचेस्टर येथे टी-20 सामन्यातही इंग्लंडने भारताला सहा विकेटने पराभूत केले होते.