आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Champions Trophy News In Marathi, Indian Hockey, Divya Marathi

चॅम्पियन्स ट्रॉफी : भारतीय हॉकी संघाला कठीण ड्रॉ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - येत्या ६ डिसेंबरपासून चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत यजमान भारतीय संघाला कठीण ड्राॅ मिळाला. स्पर्धेच्या ब गटात भारताचा समावेश करण्यात आला आहे. या गटात भारतासह २०१४ वर्ल्डकपमधील कांस्यपदक विजेत्या अर्जेंटिना संघाचाही सहभाग आहे.
ऑलिम्पिक चॅम्पियन जर्मनी, वर्ल्डकपचा उपविजेता हॉलंडही याच गटात आहे. दुसरीकडे अ गटात वर्ल्डकप विजेता व गतचॅम्पियन ऑस्ट्रेलिया, राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेता इंग्लंड, बेल्जियम व आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या पाकिस्तान संघाला सहभागी करण्यात आले आहे.

ही स्पर्धा ६ ते १४ डिसेंबरदरम्यान भुवनेश्वरमध्ये आयाेजित करण्यात आली. कलिंगा मैदानावर या स्पर्धेचे सामने खेेळवले जाणार आहेत.
भुवनेश्वरमध्ये हाॅकीला माेठ्या प्रमाणात लाेकप्रियता मिळालेली आहे. हाॅकी इंडिया लीगमधील सामन्यांना या ठिकाणी माेठी प्रसिद्धी मिळाली आहे.