आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीला वनडेत नंबर वनची संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कसोटी क्रिकेटनंतर महेंद्रसिंग धोनी वनडे क्रिकेटमध्येही भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार बनू शकतो. टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौ-यात धोनीला ही संधी आहे. भारताकडून सध्या सर्वाधिक यशस्वी वनडे कर्णधार मो. अझरुद्दीन (90 विजय) असून त्याला मागे टाकण्यासाठी माहीला तीन विजयांची गरज आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये देशाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार सौरव गांगुलीला धोनीने मागे टाकले आहे. आता वनडेत त्याच्याकडे सर्वाधिक यशस्वी कर्णधार मोहंमद अझरुद्दीनला मागे टाकण्याची संधी आहे. अझरुद्दीनने 1990 ते 1999 या काळात 174 सामन्यांत भारताचे नेतृत्व केले. यात त्याने 90 मध्ये विजय मिळवला, तर 76 सामन्यांत पराभव झाला. दोन सामने टाय झाले, तर 6 लढतींचा निकाल लागला नाही. दुसरीकडे धोनीने आतापर्यंत 154 सामन्यांत भारताचे नेतृत्व केले असून, त्याने 88 सामने जिंकले आहेत. 53 सामन्यांत भारताचा पराभव झाला असून 10 सामन्यांचा निकाल आला नाही.
धोनी सहाव्या क्रमांकावर
वनडेमध्ये सर्वाधिक सामन्यांत नेतृत्व करण्याबाबत धोनी सहाव्या क्रमांकावर आहे. त्याच्या पुढे मो. अझरुद्दीन (174), ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅलन बॉर्डर (178), श्रीलंकेचा अर्जुन रणतुंगा (193), न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग (218) आणि ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (230) आहेत