आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Charlie Adam Scores 66 yard Wonder Goal Against Chelsea

इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये 60 मीटर अंतरावरून...मॅजिक गोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये शनिवारी रात्री स्टोक सिटीचा स्कॉटिश स्टार चार्ली अ‍ॅडमने जादुई गोल केला. त्याने ६० मीटरच्या अंतरावरून हा गोल केला. ४४ व्या मिनिटात त्याच्या या शॉटमुळे स्टोकने चेल्सीसोबत १-१ ने बरोबरी केली. चेल्सीने हा सामना २-१ ने जिंकला.

बेकहॅमची आठवण : चार्लीच्या गोलने डेव्हिड बेकहॅमच्या २३ वर्षे जुन्या गोलची आठवण करून दिली. बेकहॅमने १९९६ मध्ये मँचेस्टर युनायटेडकडून असाच थरारक गोल केला होता.

विरोधक चकित : चेल्सीचे कोच जोस मरिन्हो म्हणाले, "हा अद्भुत गोल होता. प्रत्येक सुपरस्टार असा गोल करण्याचे स्वप्न पाहतो. मॅरेडोना ते मेसीपर्यंत. मात्र, काहींनाच असे जमते.'

९१ मीटरचा विक्रम : सर्वाधिक दुरून गोल करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड चार्लीच्याच टीमचा गोलरक्षक बेगोविचच्या नावे आहे. त्याने २०१३ मध्ये साऊथम्पटनविरुद्ध ९१ मीटरच्या अंतरावरून गोल केला होता.

पुढील स्लाईड्सवर पहा सामन्यातील काही खास फोटो...