आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chelsea And Tottenham Are Europa League Heavyweights

युरोपा लीग : चेल्सी अंतिम आठमध्ये दाखल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - इंग्लिश फुटबॉल क्लब चेल्सीने युरोपा लीगच्या अंतिम आठमध्ये स्थान पटकावले. चेल्सीने तिसर्‍या फेरीत रोमानियाच्या स्टेआयू बुचारेस्टचा पराभव केला. चेल्सीने ही लढत 3-1 अशा फरकाने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

सामन्याच्या 34 व्या मिनिटाला जुआन माटाने गोल करून चेल्सीला आघाडी मिळवून दिली. मात्र, त्यांना फार काळ ही आघाडी राखून ठेवता आली नाही. रोमानियाच्या फुटबॉल क्लबने 44 व्या मिनिटाला लढतीत बरोबरी मिळवली. चिरीचेसने हा गोल करून या टीमला बरोबरी मिळवून दिली. दुसर्‍या हाफमध्ये जॉन टेरीने 58 व्या मिनिटाला गोल केला. या गोलच्या बळावर इंग्लिश फुटबॉल क्लब चेल्सीने 2-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर स्पॅनिश फॉरवर्ड फर्नांडो टोरेसने 71 व्या मिनिटाला गोल केला. हा त्याचा यंदाच्या युरोपा लीगमधील पहिला गोल ठरला. या गोलच्या बळावर त्याने चेल्सीचा मोठ्या फरकाने विजय निश्चित केला.