आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेल्सीची सदरलँडवर 2-1 ने मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- चेल्सी संघाने इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीगमध्ये सदरलँडवर 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. इव्हानोविकने केलेल्या निर्णायक गोलच्या बळावर चेल्सीने सामन्यात बाजी मारली. या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी परस्परांविरुद्ध प्रत्येकी एक आत्मघातकी गोल केला.

सामन्याच्या 45 व्या मिनिटाला अझपीलीकुइटाने केलेल्या आत्मघातकी गोलचा चेल्सीला मोठा फटका बसला. या गोलमुळे सदरलँडला 1-0 ने आघाडी घेता आली. मात्र, ही आघाडी त्यांना फार काळ टिकवून ठेवता आली नाही. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत या संघाच्या किगल्लोनने चेल्सीला गोलची परतफेड केली. त्याने 47 व्या मिनिटाला आत्मघातकी गोल करून प्रतिस्पर्धी संघाला 1-1 ने बरोबरी मिळवून दिली. या रोमांचक लढतीत इव्हानोविकने गुणतालिकेत तिसºया स्थानी असलेल्या चेल्सीकडून निर्णायक गोल केला.

इतर सामन्यातील निकाल
चेल्सी वि. वि. सदरलँड (2-1),
न्यूकॅसल युनायटेड वि. वि. फुल्हाम (1-0),
टॉटेनहॅम-इव्हरटोन (2-2)
क्वीन्स पार्क रेंजर्स-विगान (1-1).