आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chelsea, Manchester City Tied Atop EPL After Memorable First Matchday Of 2015

ईपीएल : मँचेस्टर सिटीचा रोमांचक विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - फ्रँक लॅम्पर्डने केलेल्या शानदार गोलच्या बळावर मँचेस्टर सिटीने ईपीएलमध्ये रोमहर्षक विजयाची नोंद केली. या संघाने सामन्यात सदरलँडचा ३-२ अशा फरकाने पराभव केला. या शानदार विजयासह सिटीने गुणतालिकेतील दुसरे स्थान अधिक मजबूत केले. आता गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या चेल्सी आणि सिटी संघाचे प्रत्येकी ४६ गुण झाले आहेत.

याया टोऊरे (५७ मि.), एस. जोवेटिक (६६ मि.) आणि लॅम्पर्ड (७३ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून सिटीचा विजय निश्चित केला. सदरलँडसाठी रोडवेल (६८ मि.) आणि अ‍ॅडम जॉन्सनने (७१ मि.) गोल केले. मात्र, त्यांना संघाचा पराभव टाळता आला नाही.

दमदार सुरुवात करून दोन्ही संघांनी मध्यंतरापर्यंत ही लढत शून्य गोलने बरोबरीत ठेवली. दुसर्‍या हाफमध्ये टॉऊरेने सामन्यात सिटीकडून गोल करत १-० ने आघाडी मिळवली. त्यापाठोपाठ जोवेटिकने संघाच्या आघाडीला २-० ने मजबूत केले. त्यामुळे ६६ व्या मिनिटाला दाेन गोलसह सिटीला सामन्यावर पकड घेता आली.

साऊदम्पटन विजयी
साऊदम्पटनने शानदार खेळीच्या बळावर आर्सेनलचा २-० ने पराभव केला. एस. माने (३४ मि.) आणि डी. ताडिक (५६ मि.) यांनी केलेल्या गोलच्या बळावर साऊदम्पटनने सामना जिंकला. साऊदम्पटन संघाने गुणतालिकेत चौथ्या स्थानी धडक मारली.