आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chennai Super Kings And Rajasthan Royals May Not Participate In IPL

अविस्मरणीय PICS : मैदानावर पुन्हा या टीमचा जलवा दिसण्याची शक्यता कमीच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
IPL स्पॉटफिक्सिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निर्णयात स्पष्टपणे चेन्नई सुपरकिंग्जचे माजी सीईओ गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे को-ओनर राज कुंद्रा यांना दोषी ठरवले आहे. या दोन्ही कारणांमुळे सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांचे भवितव्यही टांगणीला आहे. सुप्रीम कोर्टाने या दोन्ही टीमच्या भवितव्याचा फैसला करण्यासाठी बीसीसीआयला तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यात या दोन्ही संघांवर बंदी येण्याचीही शक्यता आहे.

सुप्रीम कोर्टाची कडक भूमिका
सुप्रीम कोर्टाने कडक भूमिका घेत खेळाडू आणि अधिकार्‍यांबरोबरच संघांवरही कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कोणालाही माफ केले जाणार नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

स्पॉट फिक्सिंग : केव्हा काय झाले?
16 मे 2013 : राजस्थान रॉयल्सच्या एस श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंदेला स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटकेत
21 मे 2013 : बॉलीवूड अभिनेता विंदू दारासिंह सट्टेबाजांशी संबंध असल्याच्या आरोपात अटकेत.
24 मे 2013 : बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई आणि चेन्नई सुपर किंग्जचे अधिकारी गुरुनाथ मयप्पनही अटकेत.
2 जून 2013 : बीसीसीआयच्या बैठकीत प्रकरणाच्या तपासासाठी दोन निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करण्यात आली.
30 जुलै 2013 : बिहार क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदित्य वर्मा यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली.
05 ऑगस्ट 2013 : बीसीसीआयने न्यायाधीशांच्या समितीचा चौकशी अहवाल फेटाळल्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णया विरोधात सुप्रीम कोर्टात अपील.
13 सप्टेंबर 2013 : बीसीसीआईने श्रीसंत आणि चव्हाण यांच्यावर कायमस्वरुपी बंदी घातली.
07 ऑक्टोबर 2013 : सुप्रीम कोर्टाने फिक्सिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी जस्टीस मुदगल कमिटी स्थापन केली.
03 नोव्हेंबर 2014 : मुदगल कमिटीने सुप्रीम कोर्टात अहवाल सादर केला.
24 नोव्हेंबर 2014 : सुप्रीम कोर्टाने प्रकरणावर सुनावणीदरम्यान बीसीसीआयला फटकारले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, चेन्नई सुपरकिंग्सचे काही अविस्मरणीय PHOTO