आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chennai Super Kings Decides To Bat First Against Delhi Daredevils

IPL:चेन्नई सुपरकिंग्जचे दिल्ली डेअरडेव्हिल्सवर साम्राज्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - आयपीएल-6 मध्ये चेन्नई सुपरकिंग्जने मंगळवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 33 धावांनी मात केली. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. धोनीच्या टीमचे 11 विजयांसह 22 गुण झाले आहेत. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 4 बाद 168 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीने 9 गडी गमावून 135 धावांवर गाशा गुंडाळला. नाबाद अर्धशतक ठोकणारा चेन्नईच कर्णधार धोनी सामनावीर ठरला.

धावांचा पाठलाग करणा-या उन्मुक्त चंद (16), जोनाथन बोथा (23) आणि डेव्हिड वॉर्नर (44) यांनी केलेली खेळी व्यर्थ ठरली. चेन्नईकडून मोर्कलने तीन, मोहित शर्मा, आर.अश्विन व ब्राव्होने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणा-या चेन्नईला सलामीवीर मुरली विजय व हसीने दमदार सुरुवात करून दिली. या जोडीने पहिल्या गड्यासाठी 61 धावांची भागीदारी केली. विजय (23) धावबाद झाला. त्यापाठोपाठ हसी (26) व सुरेश रैना (7) बाद झाले. धोनीने (58*) संघाचा डाव सावरला. त्याने जडेजासोबत (24) चौथ्या गड्यासाठी 57 धावांची भागीदारी केली. ब्राव्होने (12) धोनीसोबत 37 धावांची अभेद्य भागीदारी करून चेन्नईला सन्मानजनक स्कोअर उभा करून दिला.