आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेह‘वाघ’ची डरकाळी, 'आता माझ्या मुलाला त्याचे मित्र चिडवणार नाही'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने आयपीएलच्या सातव्या सत्रात पहिल्यांदाच फोडलेल्या शतकी डरकाळीसमोर चेन्नई सुपरकिंग्जला 24 धावांनी पराभव स्वीकारण्याची नामुष्की आली. सुरेश रैनाने फक्त 25 चेंडूंत केलेल्या 87 धावांच्या धुवाधार फलंदाजीनंतरही चेन्नईचा संघ पंजाबसमोर तग धरू शकला नाही. या विजयासोबतच किंग्ज इलेव्हन पंजाबने प्रथमच आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक दिली आहे.
पंजाबने दिलेल्या 226 धावांचा पाठलाग करताना रैनाने चेन्नईला आक्रमक सुरुवात करून दिली. त्याने 25 चेंडूंचा सामना करताना 87 धावांची खेळी करून पंजाबच्या गोटात दहशत निर्माण केली होती. मात्र, तो बाद होताच पंबाजने पुन्हा एकदा सामन्यावर पकड मिळवून फायनलच्या तिकिटावर कब्जा मिळवला. चेन्नईचा संघ निर्धारित 20 षटकांत 7 बाद 202 धावाच काढू शकला.
तत्पूर्वी, चेन्नई सुपरकिंग्जने नाणेफेक जिंकून किंग्ज इलेव्हन पंजाबला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. त्यांचा हा निर्णय विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने चुकीचा ठरवत चेन्नईच्या गोलंदाजीचे अक्षरश: धिंडवडेच काढले. त्याने आयपीएलमध्ये वैयक्तिक आणि या पर्वातील दुसरे शतक ठोकले. मागच्या दोनच दिवसांपूर्वी टीम इंडियाची इंग्लंड दौर्‍यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यात वीरेंद्र सेहवागला स्थान देण्यात आले नव्हते. मात्र, या खेळीने निवडकर्त्यांना सडेतोड उत्तर मिळाले आहे. सेहवागने केलेली 122 धावांची ही खेळी आयपीएलमधील आतापर्यंची सवरेत्कृष्ट खेळी ठरली आहे. पंजाबने 6 बाद 226 धावा काढल्या होत्या.

पुढील स्लाइडमध्ये, मुलाला मित्र टोमणे मारत होते : विरू