चेन्नई - दिल्ली डेअर डेव्हिल्सविरोधात शेवटच्या चेंडूवर अवघ्या एका धावेने मिळवलेल्या रोमांचक विजयानंतर आता चेन्नई सुपरकिंग्जचा संघ शनिवारी हैदराबाद सनरायझर्स विरोधात लढण्यासाठी सज्ज झाला आहे. या सत्रातील
आपला पहिलाच सामना खेळणार्या सनरायझर्स संघात नव्या चेहर्यांचा भरणा आहे. तर, चेन्नई सुपरकिंग्ज मात्र बहुतांश आपल्या मागच्या वर्षीच्याच मोहर्यांसह मैदान गाजवण्यास तयार आहे.
कोलकाता-बंगळुरू आमनेसामने
विराट कोहली, ख्रिस गेल, एल्बी डिव्हिलर्ससारख्या दर्जेदार खेळाडूंचा भरणा असला तरी रॉयल चॅलेजर्स बंगळुरूच्या संघाला कोलकाता नाइट रायडर्सकडून त्यांच्या घरच्या मैदानावर चांगलेच आव्हान मिळू शकते. गतवेळचा विजेता कोलकाता नाइट रायडर्सने
गौतम गंभीरच्या नेतृत्वात खेळताना यंदाच्या सत्रातील पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला धूळ चारली आहे. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाची मदार त्यांच्या फलंदाजांवर आहे आणि त्यांचे फलंदाज सक्षमही आहेत.