आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chennai Super Kings Won The Toss And Elected To Field

चेन्नईचा हसीन विजय; किंग्ज इलेव्हन पंजाबवर 10 गड्यांनी दणदणीत मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली - मायकेल हसी (नाबाद 86) आणि मुरली विजय (नाबाद 50) यांच्या शानदार फलंदाजीच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्जने बुधवारी किंग्ज इलेव्हन पंजाबला 10 गड्यांनी पराभूत केले.

हसी-विजय धुवाधार - पंजाबने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 138 धावा काढल्या. प्रत्युत्तरात चेन्नईने हे लक्ष्य 17.2 षटकांत एकही विकेट न गमावता सहजपणे गाठले. चेन्नईकडून हसीने 54 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार आणि 2 षटकार तर मुरली विजयने 3 चौकार आणि 1 षटकार मारला. या सत्रातील चेन्नईचा हा पहिलाच विजय ठरला आहे.

गिलख्रिस्ट अपयशी - तत्पूर्वी, चेन्नई सुपरकिंग्जने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. किंग्ज इलेव्हन पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर अ‍ॅडम गिलख्रिस्ट (9) आणि मनदीपसिंग (9) अवघ्या 20 धावांच्या आत बाद झाले. झटपट दोन गडी बाद झाल्यानंतर तिसºया विकेटसाठी मनन वोहरा (16) आणि डेव्हिड हसी (41) यांनी 30 धावांची भागीदारी केली. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर चेन्नईच्या फलंदाजांनी या लढतीत जबाबदारीने फलंदाजी करताना एकहाती विजय मिळवून दिला.

डेव्हिड हसीची झुंज - डेव्हिड हसीने चौथ्या विकेटसाठी गुरकिरतसिंग (31) सोबतसुद्धा 56 धावा जोडल्या. एक वेळ किंग्ज इलेव्हन पंजाबची टीम 5 बाद 116 अशा सुस्थितीत होती. मात्र, पुढच्या पाच विकेट अवघ्या 22 धावांच्या आत बाद झाल्या. पंजाबकडून वोहरा, डेव्हिड हसी आणि गुरकिरतसिंग यांनाच दोनअंकी धावसंख्या गाठता आली. इतरांनी फक्त खेळपट्टीवर हजेरी लावण्याचे काम केले.

ब्राव्होच्या 3 विकेट - चेन्नईकडून मध्यमगती गोलंदाज डेवेन ब्राव्होने 27 धावांत 3 विकेट, क्रिस मॉरिसने 27 धावांत 2 विकेट, तर डर्क नॅनेसने 17 धावांत दोघांना बाद केले.

संक्षिप्त धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब 138. (डेव्हिड हसी 41, 3/27 ब्राव्हो), पराभूत विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज 17.3 षटकांत बिनबाद 139 धावा. (मायकेल हसी नाबाद 86, मुरली विजय नाबाद 50).