आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chennai Superkings Vs Delhi Daredevils Match On Tuesday

सुपरकिंग्ज-डेअरडेव्हिल्स यांच्यात आज संघर्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सलग पाच सामने गमावल्यानंतर दिल्ली डेअरडेव्हिल्सची टीम गुरुवारी आता चेन्नई सुपरकिंग्जशी दोन हात करेल. आयपीएल-6 मध्ये दिल्लीने अद्याप एकही सामना जिंकलेला नाही. दिल्लीकडे या वेळी विजयासाठी खुन्नस दिसली नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध तर शेवटच्या क्षणी हातून विजय निसटला. दुसरीकडे महेंद्रसिंग धोनीची चेन्नई सुपरकिंग्ज फॉर्मात आहे. या सामन्यात वीरेंद्र सेहवाग आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यात खुन्नस बघायला मिळू शकेल.

सुपरकिंग्जचे संमिश्र यश
आयपीएलच्या या सत्रात चेन्नई सुपरकिंग्जने संमिश्र कामगिरी केली आहे. चेन्नईने चारपैकी दोन सामन्यांत विजय मिळवला आहे. धोनीच्या टीमने दोन सामने गमावले असले तरीही या टीमला कमी लेखता येणार नाही. गुणतालिकेत ही टीम टॉप-4 मध्ये नसली तरीही संघाकडे दिग्गज खेळाडूंची गर्दी आहे.

चेन्नईचे प्रमुख खेळाडू
मुरली विजय, मायकेल हसी, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, एल्बी मोर्केल, डेवेन ब्राव्हो हे चेन्नईचे मॅचविनर खेळाडू आहेत.

दिल्लीची अडचण
दिल्लीला स्पर्धेत अद्याप विजय मिळवता आला नाही. पाचपैकी तीन सामन्यांत सेहवाग खेळू शकला नव्हता. मात्र, ज्या दोन सामन्यात वीरू खेळला, त्यात त्याला विशेष कामगिरी करता आली नाही. सेहवागसह डेव्हिड वॉर्नर, महेला जयवर्धने, इरफान पठाण, मोर्ने मोर्केल असे दिग्गज खेळाडू एकसंध होऊन कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. शाहबाज नदीम आणि केदार जाधव या युवा खेळाडूंकडून संघाला चांगल्या कामगिरीची आशा आहे.इरफान पठाण स्पर्धेत अद्याप अपेक्षेनुसार कामगिरी करू शकलेला नाही. फलंदाजीत त्याने थोडे योगदान दिले असले तरीही गोलंदाजीत तो फ्लॉप ठरला आहे.