Home »Sports »From The Field» Chennai Test- Australia Won The Toss And Elected To Bat

अश्विनच्‍या षटकारानंतर मायकल क्‍लार्कच्‍या झुंझार शतकाने ऑस्‍ट्रेलियाला सावरले

दिव्य मराठी वेब टीम | Feb 22, 2013, 20:14 PM IST

चेन्नई- रविचंद्रन अश्विनने ऑस्‍ट्रेलियाला 6 धक्‍के दिल्‍यानंतर ऑस्‍ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्‍लार्कने झुंझार शतक ठोकून संघाला संकटातून बाहेर काढले. पहिल्‍या दिवसाचा खेळ संपला त्‍यावेळी ऑस्‍ट्रेलियाने 7 बाद 316 धावा केल्‍या. मायकल क्‍लार्क 103 धावांवर नाबाद होता. शतकी खेळीदरम्‍यान त्‍याने 7 हजार कसोटी धावांचा टप्‍पा गाठला.

ऑस्‍ट्रेलियाचा निम्‍मा संघ 153 धावांमध्‍ये तंबूत परतला. त्‍यानंतर क्‍लार्कने मोझेस हेनरिक्‍सच्‍या साथीने शतकी भागीदारी करून डाव सावरला. अश्विननेच हेनरिक्‍सला बाद करुन ही जोडी फोडली. त्‍याने 68 धावा काढल्‍या. अश्विनने 6 बळी घेतले. तर रविंद्र जडेजाने 1 फलंदाजाला बाद केले.

मॅथ्‍यू वेड हा बाद होणारा पाचवा फलंदाज ठरला. अश्विनने त्‍याला 12 धावांवर पायचीत केले. अश्विनचा चेंडू तो चुकीच्‍या लाईनवर खेळला आणि पायचीत झाला. पाचही विकेट अश्विननेच घेतल्‍या आहेत. मात्र त्यानंतर कर्णधार मायकल क्लार्क आणि मधल्या फळीतील अष्टपैलू खेळाडू मोझेस हेनरिक्स यांनी केलेल्या शतकी भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. क्लार्क व हेनरिक्स यांनी आपली अर्धशतकी खेळी करीत संघाला अडचणीतून बाहेर काढले. ऑस्ट्रेलियाने 82 षटकात 5 बाद 276 धावा केल्या आहेत. क्लार्क 81 आणि हेनरिक्स (54) धावांवर खेळत आहेत.

उपहारापर्यंत ऑस्‍ट्रेलियाची चांगली स्थिती होती. परंतु, उपहारानंतर पहिल्‍याच षटकात धोकादायक शेन वॉटसनला पायचीत करुन तिसरा धक्‍का दिला. त्‍यानंतर त्‍याने डेव्‍हीड वॉर्नरलाही पायचीत केले. चेंडुचा अंदाज घेण्‍यात वॉर्नर फसला आणि स्‍टंपसमोर पकडल्‍यया गेला. वॉर्नरने 59 धावा काढल्‍या. तर वॉटसनने 28 धावा काढल्‍या. काहीशा खाली राहिलेल्‍या चेंडूवर वॉटसन चकला.

ऑस्‍ट्रेलियाला 72 धावसंख्‍येवर दुसरा धक्‍का दिल्‍यानंतर सलामीवर डेव्‍हीड वॉर्नरने शेन वॉटसनच्‍या साथीने डाव सावरला. वॉर्नरने एक बाजू लावून धरत अर्धशतक पूर्ण केले. तसेच वॉटसनसोबत अर्धशतकी भागीदारी करुन संघाची धावसंख्‍या 100च्‍या वर नेली.

डेव्‍हीड वॉर्नरला दोन जीवदान मिळाली. त्‍याचा त्‍याने पुरेपूर फायदा घेतला. अश्विनच्‍या गोलंदाजीवर वार्नरला सर्वप्रथम सेहवागने जीवदान दिले. पहिल्‍या स्‍लीपमध्‍ये त्‍याचा झेल सेहवागने सोडला. त्‍यानंतर अश्विनच्‍याच गोलंदाजीवर धोनीने वॉर्नरला यष्‍टीचीत करण्‍याची संधी सोडली होती.

तत्‍पुर्वी, अश्विनने फिल ह्युजेसचा त्‍याने त्रिफळा उडवून कांगारुंना दुसरा धक्‍का दिला. आखुड टप्‍प्‍याच्‍या चेंडूवर कट करण्‍याच्‍या प्रयत्‍नात बॅटची कड घेऊन चेंडू स्‍टंपवर आदळला. ह्युजेसने 6 धावा काढल्‍या. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्‍यानंतर भारताला 15व्‍या षटकात सलामीची जोडी फोडण्‍यात यश आले. अश्विनच्‍या गोलंदाजीवर एड कोवान यष्‍टीचीत झाला. धोनीने मिळालेल्‍या संधीवर शिताफीने काम फत्ते केले. कोवान 29 धावा काढून बाद झाला. वॉर्नरसोबत त्‍याने 64 धावांची सलामी दिली.

Next Article

Recommended