आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आनंदचे जल्लोषात स्वागत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - भारताचा विश्वविजेता विश्वनाथन आनंदचे शनिवारी येथील विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. मॉस्को येथील स्पर्धा जिंकून आनंद मायदेशी परतला.
या वेळी हार व पुष्पगुच्छ घेऊन चाहते मोठ्या संख्येत उपस्थित होते. माजी बुद्धिबळपटूंनीदेखील या वेळी खास हजेरी लावली होती. या ठिकाणी झालेल्या सत्काराने
आनंद भारावून गेला.
‘जल्लोष व उत्साहात झालेल्या स्वागतामुळे मी अधिक खुश झालो आहे. मुख्यमंत्री जयललिता यांना मी मन:पूर्वक धन्यवाद देतो. त्यांनी 20 कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर केले याचाही मला मोठा आंनद आहे. अशा प्रकारे पाठबळ मिळाले तर बुद्धिबळचा झपाट्याने विकास होऊ शकतो. स्वागतासाठी आलेल्या सर्वांचा मी फार आभारी आहे. आपले प्रेम असेच मिळत राहील, असा विश्वास आहे,’ असे आनंद
या वेळी म्हणाला.